Tuesday, June 18, 2024

धक्कादायक! ‘या’ लोकप्रिय गायिकेला भर कार्यक्रमात घातली गोळी, घटनेने सर्वत्र खळबळ

अलिकडच्या काळात बिहारमधील गोळीबारच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या गोळीबारामुळे अनेकजण जखमी होत आहेत. तर बिहारमधील छपरा शहरात एक मोठी घटना घडली आहे. तेथून नुकतीच भोजपूरी गायिका निशा उपाध्यायविषयी वाईट बातमी समोर आली आहे. तिला गोळी लागली आहे. गोळी लागल्याने गायिका गंभीर जखमी झाली आहे.

निशाला (Nisha Upadhayay) मंगळवारी रात्री गोळी लागली आहे. त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. परिस्थिती पाहता निशाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. माध्यमातील वृत्तानुसार, निशा छपरा येथे एका कार्यक्रमात प्रेझेंटेशन देण्यासाठी गेली होती. तिथे कार्यक्रमाच्या मध्यभागी स्थानिक लोकांनी गोळीबार सुरू केला. यादरम्यान निशाच्या पायाला गोळी लागली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.

नेहाच्या घरातील लोकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांनी तिच्या पायातली गोळी काढली असून ती सध्या गंभीर परिस्थीतीत आहे. त्याचवेळी तिचे चाहते तिला पाहण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी करत आहेत. निशासाठी सर्वजण एकजुटीने उभे राहिले आहेत. ती लवकरात लवकर ठणठणीत होण्यासाठी सर्वजण देवाकडे प्रार्थना करत आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे सामाजिक मेळावे आणि मनोरंजनाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोक तेथिल नेत्यांना आणि स्थानिक अधिकाऱ्यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि या कृत्यामागील दोषींना विलंब न लावता पकडून न्याय मिळवून देण्याची विनंती करत आहेत. या घटनेमुळे कलाकारांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Bhojpuri singer Nisha Upadhyay has been shot)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
लग्न कधी आहे? असा प्रश्न विचारताच परिणीती चोप्राने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडिओ झाला व्हायरल
आलिया भट्टवर कोसळला दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

हे देखील वाचा