Saturday, June 15, 2024

लग्न कधी आहे? असा प्रश्न विचारताच परिणीती चोप्राने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडिओ झाला व्हायरल

परिणीती चोप्रा नेहमीच तिच्या विविध गोष्टींमुळे लाइमलाईट्मधे असते. तिच्या साखरपुड्यानंतर तर ती सतत तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे कमालीची गाजत आहे. परिणितीचा साखरपुडा तर झाला. मात्र आता मीडियामध्ये आणि तिच्या फॅन्समध्ये तिच्या लग्नाच्या चर्चांना ऊत आला आहे. परी आणि राघव यांच्या साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या तारखांबद्दल अनेक बातम्या समोर येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यातच आता परिणितीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तिला पापराजी तिच्या लग्नाच्या तारखेबद्दल विचारताना दिसत आहे. परिणीती तिच्या बिल्डिंग बाहेर पडताना दिसत आहे. तिथे असणारे सर्व पापाराजी तिला पाहताच एक प्रश्न विचारताना दिसतात की, लग्न कधी आहे? लग्नाची तारीख कधी आहे? काहीतरी सांग आता लपवू नको. पापराजींचा हा प्रश्न ऐकून परीच्या चेहऱ्यावर एक हसू आले. मात्र तिने त्यांच्या प्रश्नावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. बस हसून तिच्या गाडीमध्ये बसत बाय बोलून निघून गेली.

यावेळी परिणीती चोप्रा अतिशय सध्या लूकमध्ये दिसली. तिने पांढऱ्या रंगाचा अतिशय साधा ड्रेस घातला होता. यावर नागरे देखील घालत गॉगल लावून लूक कम्प्लिट केला होता. दरम्यान परिणीती आणि राघव यांनी १३ मे रोजी दिल्ली येथे कापूरथला साखरपुडा केला. राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचे खासदार आहे. आता सगळ्यांनाच त्यांच्या लग्नाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”
संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच

 

हे देखील वाचा