आलिया भट्टवर दु:खादचा डोंगर कोसळला आहे. तिचे आजोबा नरेंद्र राझदान यांनी आज १ जून रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आलियाच्या आजोबांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या दु:खद बातमीची माहिती खुद्द सोनी राझदानने इंस्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे दिली आहे.
आलिया भट्टची (Alia Bhatt) आई सोनी राझदानने तिच्या वडिलांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ‘डॅडी’ यासोबत त्यांनी हार्ट ब्रेकचा इमोजीही देखील शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
त्याचवेळी आलियाने देखील इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पोस्ट करताना तिने कॅप्शन लिहिले की, ‘माझे आजोबा. माझे हिरो, ते 93 वर्षाचे असताना गोल्फ खेळत होते, वयाच्या 93 वर्षापर्यंत त्यांनी खूप काम केले. इतकेत नाही तर ते चविष्ठ ऑम्लेट बनवत होते. त्यांनी आम्हाला उत्तम कथा सांगितल्या, आपल्या नातवासोबत ते नेहमीच खेळायचे, त्यांनचे कुटुंबावर प्रचंड प्रेम होते.’
दरम्यान, नरेंद्र राझदान यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना यापूर्वीही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नरेंद्र राझदान यांना फुफ्फुस संसर्गाचा त्रास वाढला होता. या काळात आलियाला तिच्या आजोबांसोबत राहायचे असल्याने ती विमानतळावरून परत गेली होती. आलियाने तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘आयफा’ पुरस्कार जिंकला. मात्र, आलिया आजोबांसाठी हा पुरस्कार घेण्यासाठी गेली नव्हती. (Alia Bhatt’s grandfather passed away)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”
संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच