भोजपुरी अभिनेता आणि गायक रितेश पांडे हा त्याच्या गायकीसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या आवाजात दुःखद गाणी जेव्हा समोर येतात, तेव्हा ती गाणी काहीतरी कमाल करूनच जातात. त्याच्या आवाजातून तो दुःख समोरच्यापर्यंत पोहोचवतो. अशातच त्याचे ‘डोली रोका हो काहर’, हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे एक दर्दी गाणे आहे. ब्रेकअप झालेल्या कोणत्या व्यक्तीने जर हे गाणे पाहिले, तर कदाचित त्याला अश्रू रोखता येणार नाहीत.
रितेश पांडेने हे गाण्याचा व्हिडिओ वर्ल्डवाईड रेकॉर्ड्सच्या भोजपुरी यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केला आहे. हे गाणे प्रदर्शित होताच भोजपुरी प्रेक्षकांच्या ओठांवर आले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्ती प्रतिसाद मिळत आहे. तसेच या गाण्याचा व्हिडिओ देखील प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अभिनेता त्याची सहकलाकार प्रगती भट्ट हिच्यावर खूप प्रेम करत असतो. मात्र, तिचे लग्न इतर कोणाशीतरी होत असते. यामुळे त्याचे मन दुखते. तो गाण्यात खूप रडताना दिसत आहे. या गाण्यात ते दुःख त्याच्या डोळ्यात आणि अभिनयात स्पष्ट दिसत आहे. (Bhojpuri singer Ritesh Pandey new sing doli roka ho kahar release)
या गाण्यामध्ये रितेश आणि प्रगतीची एक छोटीशी सुंदर लव्हस्टोरी दाखवली आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या गाण्याबाबत रितेशने सांगितले की, “गाण्याला आम्ही खूप काळजीपूर्वक अभ्यास करून बनवले आहे. यामध्ये आम्ही एका प्रेम करणाऱ्याचे दुःख दाखवले आहे. हे गाणे माझ्या अपेक्षेपेक्षाही खूप चांगले झाले आहे. यासाठी संपूर्ण टीमचे धन्यवाद, खास करून, रत्नाकर कुमार यांचे धन्यवाद ज्यांनी मला हे गाणे दिले.”
या गाण्याचे बोल राज कुमार साहनीने लिहिले आहे, तर छोटू साहनी यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणे ऐकता क्षणीच तुमच्या हृदयात घर करून जाईल. या गाण्याचे निर्माते रत्नाकर कुमार आहे. व्हिडिओ दिग्दर्शक आर्यन देव, डीओपी राजेश राठोर, रवी राठोर हे आहेत. या गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ
-जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, प्रदर्शनाची तारीखही जाहीर