Wednesday, March 12, 2025
Home भोजपूरी भोजपुरी गायिका असणारी शिल्पी राजने एमएमएस प्रकारांवर मौन सोडत म्हटले, ‘हा माझ्याविरोधात असणारा कट’

भोजपुरी गायिका असणारी शिल्पी राजने एमएमएस प्रकारांवर मौन सोडत म्हटले, ‘हा माझ्याविरोधात असणारा कट’

भोजपुरी इंडस्ट्री आणि या इंडस्ट्रीमधील कलाकार सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतात. कधी वैयक्तिक आयुष्य तर कधी व्यावसायिक आयुष्य त्यांना प्रकाशझोतात आणत असते. आता भोजपुरी इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध गायिका असणारी शिल्पी मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा एक एमएमएस ऑनलाईन लीक झाला आणि तो आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या व्हिडिओमध्ये शिल्पी तिच्या बॉयफ्रेंडसोबत आपत्तीजनक परिस्थिती दिसत आहे. आता या एमएमएस लीक घटनेवर शिल्पी राजने मौन सोडले असून, एका मुलाखतीमध्ये तिने यावर भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मला माहित नाही या एमएमएसमध्ये माझ्यासारखी दिसणारी ती मुलगी कोण आहे, हा फक्त मला बदनाम करण्याचा एक कट आहे.”

या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “खरं सांगायचे तर मी हा व्हायरल होणारा व्हिडिओ अजून पाहिलाच नाही. मला लोकांकडूनच समजले की हा व्हिडिओ पाहून लोकं माझे नाव घेत आहे. आता मी हा विचार करते या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या सारखी दिसणारी ती मुलगी आहे तरी कोण? हा व्हिडिओमध्ये मला बदनाम करण्यासाठी आणि माझी इमेज खराब करण्यासाठी केलेला कट आहे. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कोणी पुढे जाते तेव्हा लोकं त्याचे पाय खेचण्यासाठी असेच काही करतात.”

तिने या मुलाखतीमध्ये हे देखील सांगितले की या विरोधात तिने कोर्टात केस देखील टाकली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय आणि खऱ्या माहितीशिवाय तिचे नाव घेतले जात असल्यामुळेच तिने हे पाऊल उचलले आहे. या एमएमएसची बातमी आल्यानंतर तिचा भाऊ खूपच टेन्शनमध्ये होता त्यानेच तिला हे सर्व सांगितले. शिल्पीला आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचे आहे. तिला बॉलिवूडमध्ये एक गाणे गाण्याची इच्छा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा