×

गावोगावच्या यात्रांमध्ये झळकतेय ‘तिरसाट’ची टीम, दमदार चित्रपट होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नाविण्यपूर्ण कथा असलेले चित्रपट प्रेक्षकांंच्या भेटीला येत आहेत. नवीन कलाकार लेखक आणि दमदार कथा यांमुळे या चित्रपटांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यामध्ये सध्या ‘तिरसाट’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर याआधीच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे सध्या धमाकेदार प्रमोशन सुरू असून गावोगावच्या जत्रांमध्ये या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, दिग्दर्शक प्रतिक टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्या ‘तिरसाट’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा नजरेत भरणारा पोस्टर, थेट काळजाला भिडणारी गाणी आणि दमदार कलाकारांमुळे या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या महाराष्ट्रातील गावोगावात यात्रांचा धुमधडाका सुरू आहे. या यात्रांमध्ये आठवडाभर चालणारे बैलगाड्या शर्यती, कुस्ती, तमाशे अशा कार्यक्रमांमधूनही या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम गावोगावच्या यात्रांमध्ये जाऊन देवाच्या दर्शनासोबतच प्रेक्षकांमध्येही मिसळत आहेत. या भेटीमध्ये प्रेक्षकांचाही सहभाग लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच या चित्रपटाच्या टीमने नगरमधील निघोज गावच्या यात्रेत हजेरी लावली होती. यावेळी ग्रामदेवतेचे दर्शन घेत त्यांनी आपल्या चित्रपटाचा पोस्टरही देवासमोर ठेवत आशिर्वाद घेतले होते. यावेळी लोकांचा उत्साह आणि आनंद पाहता प्रेक्षकांंना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. निरज सुर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवीन जोडी सिने जगतात पदार्पण करत आहे. चित्रपटाचा पोस्टर आणि गाणी यावरुन यामध्ये भन्नाट प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रतिक टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी याआधी ‘आयटमगिरी’ या चित्रपटाची निर्मीती केली होती. चित्रपटाच्या टीमने अलिकडेच थेऊरच्या गणपतीचेही दर्शन घेतले होते. यावेळीही प्रेक्षकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post