×

‘हा’ बॉलिवूडला शिकवलेला धडा आहे म्हणत मनोज वाजपेयीने हिंदी चित्रपट निर्मात्यांवर केली टीका

‘बाहुबली’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत असलेला केजीएफ चित्रपटाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला जगभरात वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. सध्या सिनेजगतात फक्त दाक्षिणात्य चित्रपटांचीच हवा पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक दमदार चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने सर्वांनाच दाक्षिणात्य कलाकारांचे आणि त्यांच्या चित्रपटांचे वेड लागले आहे. यामुळेच सध्या बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये चांगलीच जुगलबंदी चालली आहे. अनेक मोठमोठे कलाकारही सध्या टॉलिवूड सिनेजगताचे कौतुक करताना दिसत आहेत. अलिकडेच अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनीही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या चित्रपट जगतात सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. कमाई आणि लोकप्रियता सगळ्याच बाबतीत दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना पिछाडीवर टाकले आहे ज्यामुळे सर्वत्र टॉलिवूडच्या चित्रपटांचे कौतुक होताना दिसत आहे. अलिकडेच लोकप्रिय अभिनेता मनोज वाजपेयीनेही याबद्दल आपले परखड मत व्यक्त करताना टॉलिवूडच्या चित्रपटांचे कौतुक केले आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाने बॉलिवूडला चांगलाच धक्का बसल्याचेही मत व्यक्त केले आहे.

एका मुलाखतीत बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला की, “ते खूप जिद्दी आहेत. ते प्रत्येक शॉट असा घेतात जणू काही जगातील सर्वोत्तम शॉट घेतो. खूप आवड आणि विचार लागतो. ते एकदाही प्रेक्षकांबद्दल अपमानास्पदपणे बोलत नाहीत. अहो प्रेक्षकांना समजेल असे ते म्हणत नाहीत. ते जाईल होईल अशा भाषेत कधीच बोलत नाहीत. एखाद्या चित्रपटाची त्यांनी कल्पना केली तशी ते शूट करतात.”

मनोज बाजपेयींनी ‘पुष्पा: द राइज’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर 2’ ची उदाहरणे देऊन बॉलीवूड का मागे राहिले आहे. त्यात काय कमतरता आहे? याबद्दलही आपले मत व्यक्त केले आहे. याबद्दल बोलताना “तुम्ही ‘पुष्पा’ आणि KGF: 2 च्या मेकिंगकडे पाहिले तर तो अचूक आहे. प्रत्येक दृश्य आणि फ्रेम त्यांच्यासाठी जीवन मरणाची परिस्थिती असल्यासारखे चित्रित केले आहे. हीच आपल्यात कमतरता आहे. आम्ही  चित्रपटांचा केवळ पैसा आणि बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने विचार करू लागलो. आपण स्वतःवर टीका करू शकत नाही. म्हणूनच आम्ही त्यांना ‘वेगळे’ म्हणत वेगळे करू. पण मेनस्ट्रीम सिनेमा कसा बनवायचा याचा मुंबई फिल्म इंडस्ट्रीसाठी हा धडा आहे,” असे म्हणत थेट बॉलिवूडवर हल्ला केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post