Wednesday, November 13, 2024
Home भोजपूरी हॉटनेसचा तडका! खेसारी अन् यामिनीच्या नवीन गाण्याचा युट्यूबवर राडा, जबरदस्त केमिस्ट्रीला 30 लाख हिट्स

हॉटनेसचा तडका! खेसारी अन् यामिनीच्या नवीन गाण्याचा युट्यूबवर राडा, जबरदस्त केमिस्ट्रीला 30 लाख हिट्स

होळीचा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय. अशात सिनेसृष्टीतील कलाकार होळी सणाच्या तयारीला आतापासूनच लागले आहेत. या सणाची तयारी भोजपुरी सिने इंडस्ट्रीनेही पूर्ण केली आहे. अशात खेसारी लाल यादव आणि यामिनी सिंग हिचे नवीन हॉट व्हिडिओ गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे नाव ‘गरम गोदाम’ असे आहे. हे गाणे रिलीज होताक्षणीच व्हायरल होत आहे.

गाण्याला 36 लाख हिट्स
खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि यामिनी सिंग (Yamini Singh) यांच्या ‘गरम गोदाम’ (Garam Godam) या गाण्याने युट्यूबवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला युट्यूबवर एका दिवसातच 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत या गाण्याला 36 लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसेच, 1 लाख 88 हजारांहून अधिक लाईक्स तसेच, 37 हजार कमेंट्सही मिळाल्या आहेत. गाण्यातील यामिनीच्या हॉट अदा पाहून चाहत्यांनाही घाम फुटला आहे. खेसारी आणि यामिनीचे हे गाणे सारेगामा हंगामा भोजपुरी या चॅनेलवर रिलीज करण्यात आले आहे.

यामिनीच्या बोल्डनेसचा तडका
गाण्याचे बोल चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. यासोबतच यामिनी सिंगच्या बोल्डनेसचा तडकाही चाहत्यांना घायाळ करत आहे. यावरून समजते की, होळीच्या सणापूर्वीच हे गाणे चाहत्यांच्या ओठांवर आले आहे.

प्रेमाच्या रंगात मिसळला होळीचा गुलाल
खेसारी लाल यादव आणि यामिनी सिंग यांचे हे गाणे तरुणाईला आकर्षित करत आहे. गाण्यामध्ये खेसारी आणि यामिनीची शानदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्यात प्रेमाच्या रंगासोबतच होळीचा गुलालही पाहायला मिळत आहे. या जोडीला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या गाणअयाने रिलीज होताच कमाल दाखवण्यास सुरुवात केली आहे. होळीच्या रंगात रंगलेले कलाकार चाहत्यांनाही थिरकण्यास भाग पाडत आहेत. या गाण्याला बोल्ड बनवण्यासाठी यामिनी पाण्यामध्ये भिजल्याचेही दिसत आहे.

भोजपुरी होळी गाणे ‘गरम गोदाम’ला खेसारी लाल यादव आणि नेहा राज यांनी आवाज दिला आहे. या गाण्याचे बोल भागीरथ पाठक यांचे आहेत. या गाण्याला शुभम राज याने संगीत दिले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी लकी विश्वकर्मा यांनी केली आहे. (bhojpuri song of khesari lal and yamini singh garam godam holi see here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात, टॅटू दाखवत केला नात्याचा खुलासा; पाहा फोटो
आता सुट्टी नाही! 21 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा