सध्या यूट्यूबवर भोजपुरी गाण्यांची धमाल सुरू असल्याचे दिसत आहे. याच इंडस्ट्रीमधील गायक आणि अभिनेता राकेश मिश्राचे म्युझिक अल्बमसोबतच आता त्याची चित्रपटातील गाणीही व्हायरल होत आहेत. नुकतेच ‘दुश्मन सरहद पार के’ चित्रपटातील एक गाणे जबरदस्त व्हायरल होत आहे. हे गाणे राकेश मिश्रा आणि पूनम दुबे यांच्यावर चित्रीत केले आहे.
या गाण्याचे नाव ‘सेज पर उडाव न पतंग’ असे आहे. हे गाणे वेव्ह म्युझिकने आपल्या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ केले आहे. या गाण्यात राकेश मिश्रा आणि हॉट अभिनेत्री पूनम दुबे यांची केमिस्ट्री खूपच शानदार आहे. पूनम या गाण्यात एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यांच्या या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसही पडताना दिसत आहे. आतापर्यंत या गाण्याला २३ हजारांहून अधिक लाईक्स आणि १ हजारापेक्षा अधिक कमेंट्स मिळाले आहेत.
खरं तर मागील वर्षी राकेश मिश्राचे ‘ए राजा जाई न बहरिया’ हे म्युझिक अल्बम आजही प्रेक्षकांमध्ये मोठ्या आवडीने पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे राकेश मिश्रा हा असा स्टार आहे, ज्याच्या गाण्यांना पेड प्रमोशनशिवाय लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात.
अशामध्ये त्याचे ‘सेज पर उडाव न पतंग’ गाणे रिलीझ झाले आहे. या गाण्याला दोनच दिवसात १० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याबद्दल बोलताना राकेशने म्हटले की, “आम्ही खूप मेहनतीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. शॉर्टकट घेण्यापेक्षा आम्ही साधना निवडली. त्याचसोबत बॅकग्राऊंड म्युझिकशिवाय मी कामावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच प्रेक्षकांना माझे काम आवडत आहे. मग ते अल्बमचे गाणे असो किंवा चित्रपटातील, त्यांनी मला प्रेम आणि आशीर्वाद दिला. हीच माझी कमाई आहे. मी आपल्या चाहत्यांना एवढेच आवाहन करेल की, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव मिळत राहो. आम्ही तुमच्यासाठी चांगले चित्रपट आणि चांगले गाणे आणू.”
या गाण्याचे बोल शाम देहाती यांनी लिहिले आहेत, तर आवाज अलका झा यांनी दिले आहे. याव्यतिरिक्त म्युझिक दिग्दर्शक छोटे बाबा हे आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ओह माय गॉड! ४८ वर्षीय मंदिरा बेदीने केलं बिकिनीमध्ये वर्कआऊट, एकदा नजर टाकाच
-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’
-लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मृती इराणींनी हटके अंदाजात दिल्या पतीला शुभेच्छा