खेसारी लाल यादवच्या गाण्यावर मुलीने लाल साडी नेसून केला अफलातून डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकार आपल्या गाण्यांमुळे कमालीचे चर्चेत असतात. त्यांची गाणी प्रदर्शित होताक्षणीच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागतात. असाच एक सुपरस्टार म्हणजे खेसारी लाल यादव होय. खेसारीचे गाणे भोजपुरी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालतात. आपल्या गाण्यांच्या जोरावर तो आज इतका मोठा सुपरस्टार झाला आहे. खेसारीने चाहत्यांमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याच्या गाण्यावर नेहमीच चाहते वेगवेगळे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी खेसारीच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. (Bhojpuri Superstar Khesari Lal Yadav Song Piya Khesari Bade Anari Girl Dance Video On Roof In Saree)

ज्योतिका पासवान या इंस्टाग्राम मॉडेल आणि जोश ऍप स्टारने नुकतेच इंस्टाग्राम रील व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत ती खेसारी लाल यादवच्या ‘पिया खेसारी बडे अनाडी़’ या भोजपुरी गाण्यावर लाल रंगाची साडी नेसून छतावर अफलातून डान्स करताना दिसत आहे.

तिने रविवारी (२७ जून) हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला काही तासांमध्येच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत ती एकदम आकर्षक दिसत आहे. तिच्या डान्ससोबतच ती कमालीचे एक्सप्रेशन्सही देत आहे. तिच्या या व्हिडिओला ३० हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

नुकतेच खेसारी लाल यादव आणि बॉलिवूडची स्टार गायिका स्वाती शर्माने गायलेले ‘मोहल्ला माचिस हो गया’ गाणेही जोरदार व्हायरल होत आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ या चित्रपटातील ‘बन्नो तेरा स्वॅगर’ हे गाणे स्वाती शर्माने गायले होते. या गाण्यातून तिला अफाट यश मिळाले आणि ती स्टार गायिका बनली.

खेसारी लाल यादवने आतापर्यंत ‘लिट्टी चोखा’, ‘बाप जी’, ‘कुली नं १’, ‘नागदेव’, ‘बादल’, ‘दीवानापन’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.