हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’


मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे खासकरून तिच्या सोज्वळपणासाठी ओळखली जाते. सतत तिचे पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करत राहते. या सुंदर फोटोंमुळे ऋतुजा बऱ्याचवेळा चाहत्यांच्या चर्चेचा विषय देखील बनते. आता ती बरीच बोल्ड देखील राहायला लागली आहे. तिचे हॉट फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आता अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर तिचा पहिला रील व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओखालच्या कॅप्शननेही सोशल मीडियाचं लक्ष वेधलं आहे. वास्तविक ऋतुजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती आस्था गिलच्या ‘पानी पानी’ गाण्यावर अदा दाखवताना दिसली आहे. यात तिने पांढऱ्या रंगाची साडी आणि सोबतच स्लीवलेस ब्लाउज परिधान केलं आहे, ज्यात ती बऱ्यापैकी हॉट दिसत आहे.

आता ऋतुजाच्या या पोस्टवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “माझं पहिलं रील. यासाठी विशेष टॅलेंट लागतो, जो माझ्यात नाही.” मात्र तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडल्याचे दिसून येत आहे. शिवाय तिने या लूकमध्ये एक फोटोही शेअर केला आहे. यालाही चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. (marathi actress rutuja bagwe shared hot video in saree and said i dont have that telent)

सन २००८ मध्ये ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून ऋतुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’,’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकच नंबर! आता जावई- सासरे होणार एकमेकांचे सख्खे शेजारी; नवीन घरासाठी धनुष करणार ‘इतके’ कोटी खर्च

-‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेच्या ग्लॅमरस लूकने चोरली लाखो मने; एक नजर टाकाच

-‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.