Friday, March 29, 2024

एकदा नव्हे, तर दोनदा जेलची हवा खाऊन आलाय बॉलिवूडचा ‘सिंघम’; म्हणाला, ‘आता माझी प्रतिमा…’

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण (Ajay Devgan) आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. ऍक्शनच्या बाबतीत अजय अनेक मोठमोठ्या कलाकारांना टक्कर देतो. पण तुम्हाला माहितीये का, की कॉलेजच्या काळात अजयला गुंडा म्हणत असे. अशातच आता त्याच्याशी संबंधित काही जुने किस्से पुन्हा एकदा समोर आले आहेत.

खरंतर, अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘रनवे ३४’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच त्याने फिल्म कम्पॅनियनला एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या जुन्या दिवसांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. हा अभिनेता आज सिंघम म्हणून ओळखला जात असेल, पण एक काळ असाही होता, जेव्हा त्याला गुंडा म्हटले जायचे. आश्‍चर्य म्हणजे, त्याने दोनदा तुरुंगाची हवाही खाल्ली आहे. (ajay devgn busy in promotion of runway 34 gives interview opens up on being jailed twice)

अशा परिस्थितीत जेव्हा त्याला मुलाखतीदरम्यान याबाबत विचारले गेले, तेव्हा त्याने यावर उघडपणे बोलण्यास नकार दिला. तो म्हणाला, “याबद्दल बोलायला नाही पाहिजे. मी हे सर्व आधी सांगू शकलो असतो, पण आज माझी प्रतिमा चांगली आहे, जी आपण राखली पाहिजे. तरुण वयात, प्रत्येकजण विचित्र गोष्टी करतो. कायदा आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या गोष्टी त्या काळी इतक्या उदारमतवादी होत्या, पण आता तसं नाही. आता मी अशा अनेक गोष्टींपासून दूर आहे.”

अजय देवगण अभिनेता असण्यासोबतच, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘दिलवाले’, ‘दिलजले’, ‘जख्म’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा ‘रनवे ३४’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजयशिवाय अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २९ एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा