पठडीबाहेरील भूमिका साकारून भूमी पेडणेकरने बनवलीय तिची ओळख; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या रंजक गोष्टी


अनेकदा आपण पाहिले असेल की, अभिनेत्री या त्यांचे पदार्पण करताना बहुतेक करून नॉर्मल मसाला चित्रपटांचीच निवड करतात. पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींना सुरूवातीला असेच सिनेमे ऑफर केले जातात. कारण पहिल्याच सिनेमात प्रयोग करताना अभिनेत्री अनेकदा कचरतात. पहिल्याच सिनेमात कोणत्याही प्रकारचा धोका अभिनेत्रींना घ्यायचा नसतो. मात्र मोजक्या अशा अभिनेत्री आहे, ज्यांनी त्यांच्या अभिनयाची ताकद दाखवण्यासाठी, त्यांचा पहिला सिनेमा एक सुवर्णसंधी समजला आणि त्यांनी स्वतःवर प्रयोग करत दमदार आणि यशस्वी एन्ट्री केली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. आज भूमीने खूपच कमी काळात तिचे एक बळकट स्थान या क्षेत्रात निर्माण केले आहे. ती आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी अधिक माहिती.

भूमीचा जन्म १८ जुलै १९८९ रोजी मुंबईमध्ये झाला होता. भूमीचे वडील महाराष्ट्रीयन होते, तर आई हरयाणाची आहे. भूमीचे वडील सतीश पेडणेकर हे महाराष्ट्राचे माजी श्रममंत्री होते, तर आई एक सामाजिक कार्यकर्ता होती. भूमी १८ वर्षाची असतानाच तिच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला. तिचा एक सामान्य मुलगी ते यशस्वी अभिनेत्री होण्याचा प्रवास सोपा नव्हता. या ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करत राहूनही, तिला अभिनेत्री होण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.

एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की, “माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी माझे काम १० पट जास्त मेहनतीने करण्यास सुरुवात केली. मला नेहमी वाटायचे की, सर्व चुकीचे घडत आहे. मात्र मी सुरुवातीच्या दोन वर्षात स्वतःला खूप हिंमत दिली.” अभिनेत्री होण्याच्या अगोदर भूमीने यशराज स्टुडिओमध्ये कास्टिंग डायरेक्टर असणाऱ्या शानू शर्मासोबत सहायक म्हणून काम केले. (bhumi pednekar birthday know unknown facts about her)

सन २०१५ मध्ये भूमीच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे चीज झाले आणि तिला तिचा पहिला सिनेमा ‘दम लगाकर हाइशा’ मिळाला. या चित्रपटात ती अभिनेता आयुष्मान खुराणासोबत झळकली. हा सिनेमा तुफान गाजला, सोबतच तिचा अभिनय आणि चित्रपटातील गाणी देखील हिट झाली. या सिनेमासाठी भूमीने तिचे वजन ९२ किलो एवढे वाढवले होते. त्यामुळे या चित्रपटातली ती आणि आताची भूमी यांना ओळखता देखील येत नाही. या चित्रपटासाठी भूमीला पदार्पणचे सर्वच पुरस्कार मिळाले होते.

भूमीने तिच्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “ती टिपिकल मुंबई गर्ल आहे. मी जरी पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारत असले, तरी मी खऱ्या आयुष्यात एक नॉर्मल मुलगी आहे. मला तयार व्हायला दोन तास लागतात. कुठे जायचे असेल, प्रमोशन, पार्टी तरी मी तयार व्हायला माझा पूर्ण वेळ घेते.”

आपण जर भूमीच्या चित्रपटांवर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, ती नेहमी इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या आणि पठडी बाहेरील भूमिकांना प्राधान्य देते. ग्लॅमरस भूमिका तर ती निभावतेच, मात्र बऱ्याच भूमिका या प्रवाहापेक्षा हटके असतात. जसे की ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’, ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटातील विषय आपल्या देशात लोकं सार्वजनिक ठिकाणी बोलताना घाबरतात, मात्र तिने असे सिनेमे केले. याबद्दल ती सांगते, “मला एका चांगल्या कथेला नकार देण्यासाठी कोणतेच कारण दिसून येत नाही. उघड्यावर शौचास जाणे किंवा नपुंसकता असणे यावर भारतात पहिल्यांदा सिनेमे तयार झाले आहेत. त्यामुळे अशा चित्रपटांचा भाग असणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”

भूमीने आता पर्यंत ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’, ‘पति पत्नी और वो’, ‘सोन चिरैया’, ‘सांड की आंख’, ‘दुर्गामाता’, ‘बाला’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर आगामी काळात ती ‘मिस्टर लेले’, ‘रक्षाबंधन’, ‘बधाई दो’ अशा मोठ्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

अवघ्या सहा वर्षांच्या करियरमध्ये भूमीने तुफान यश संपादन केले आहे. यासोबतच ती कोट्यावधी संपत्तीची मालकीण देखील आहे. भूमी एका सिनेमासाठी २ कोटी रुपये घेते. महिन्याला ती जवळपास २५ लाखांपेक्षा अधिक पैसे कमावते. तर वर्षाला ३ कोटींपर्यंत कमावते. एका रिपोर्टनुसार तिची नेटवर्थ ११ कोटी रुपये आहे.

भूमीने मुंबईत प्राइम लोकेशनवर आलिशान घर घेतले आहे. जिथे ती तिच्या आई आणि बहिणीसोबत राहते. शिवाय तिच्याकडे ८० लाख रुपये किंमत असलेल्या लँड रोवर रेंज रोवर, एसयूवी अशा गाड्या आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज; लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार टीव्हीची ‘किन्नर सून’

-फिल्म इंडस्ट्रीबाबत राजपाल यादवचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आर्थिक तंगी दरम्यान इंडस्ट्रीने मला…’

-बिग बींच्या ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता दुर्दैवी अंत; लहानपणीच केली होती तिच्या आकस्मिक मृत्यूची भविष्यवाणी


Leave A Reply

Your email address will not be published.