Friday, March 29, 2024

बिग बींच्या ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता दुर्दैवी अंत; लहानपणीच केली होती तिच्या आकस्मिक मृत्यूची भविष्यवाणी

‘आनंद’ चित्रपटात एक संवाद आहे, ‘जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही.’ आयुष्य लहान असो किंवा मोठे तुम्ही ते कसे जगता यावर सर्व आधारित असते. भविष्यात काय होणार याची आपल्याला काहीच माहिती नसते. मात्र आपण आपला वर्तमान आणि कसा जगतो हे खूप महत्वाचे ठरते. मनोरंजन क्षेत्रात असे असेक कलाकार आहेत, ज्यांचा खूप लवकर आणि आकस्मिक दुर्दैवी अंत झाला. मात्र आजही त्याच्या चित्रपटांमुळे त्यांच्या अभिनयामुळे ते कलाकार प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अशीच एक साऊथ आणि हिंदी अभिनेत्री म्हणजे सौंदर्या. नावाप्रमाणेच सौंदर्यवान असणाऱ्या सौंदर्या यांनी ‘सूर्यवंशम’ सिनेमातून हिंदी चित्रपटात एन्ट्री केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेल्या ह्या अभिनेत्रीचा देखील खूप कमी वयात दुर्दैवी अंत झाला. आज सौंदर्या यांची जयंती, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

सौंदर्या यांचा जन्म १९ जुलै १९७२ रोजी कर्नाटकमध्ये झाला. त्यांचे खरे नाव सौम्या सत्यनारायण होते. त्यांचे वडील हे कन्नड सिनेसृष्टीचे लेखक आणि निर्माता होते. घरात त्यांच्या लहानपणापासूनच चित्रपटांचे वातावरण होते. मात्र असे असूनही त्यांना डॉक्टर व्हायचे होते. म्हणूनच त्यांनी एम.बी.बी.एस.ला प्रवेश घेतला. मात्र वडिलांच्या मित्राच्या खूप आग्रहामुळे त्यांनी एक चित्रपट करण्याचे ठरवले आणि सुदैवाने त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांचे या ग्लॅमर जगात मन रमायला लागले आणि त्यांनी इथेच करियर करण्याचे ठरवेल. १९९२ साली त्यांनी कन्नड चित्रपट ‘गंधर्व’मधून अभिनयात पदार्पण केले.

सौंदर्या यांनी त्यांच्या करियरमध्ये मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सोबतच या मनोरंजन विश्वतातील सुपरस्टार असणाऱ्या रजनीकांत, अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील काम केले. १९९९ साली त्यांनी ‘सूर्यवंशम’ ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा भलेही फ्लॉप झाला असला, तरी सौंदर्या यांच्या अभिनयाची चर्चा खूप झाली. सौंदर्या यांचे हिंदी चित्रपटांमध्ये खूप मोठे करियर असेल असे सर्वांचेच मतं होते. पण नियतीला काही वेगळेच करायचे होते. दुर्दैवाने ‘सुर्यवंशम’ हा त्यांचा पहिला आणि शेवटचा हिंदी सिनेमा ठरला.

सौंदर्या या साऊथ चित्रपटांमध्ये टॉपच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. करियरच्या शिखरावर असताना त्यांनी २००३ साली सॉफ्टवेयर इंजिनियर असणाऱ्या जीएस रघु या त्यांच्या मित्राशी लग्न केले. त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये त्यांच्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्या प्रचारासाठी करीमनगर येथे जात होत्या. त्यांनी बंगळुरू जक्कुर एयरफील्डवरून टेकऑफ केले आणि ते १०० फुटापर्यंत देखील गेले नसेल, तोपर्यंत हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या दुर्दैवी घटनेत सौंदर्या, त्यांचा भाऊ आणि इतर दोघांचा जागीच मृत्य झाला.

हेलिकॉप्टर जिथे पडले तिथे एक जण काम करत होता. तो प्रवाशांना वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहचला, मात्र तेवढ्यात जोरात धमाका झाला आणि सर्वत्र आग लागली. मृत व्यक्तींची हालत इतकी खराब होती की, त्यांची ओळख पटवणे देखील मुश्किल झाले होते. असे म्हटले जाते की, ज्यावेळी सौंदर्या यांचा मृत्य झाला, तेव्हा त्या गरोदर देखील होत्या. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने, अनाथ मुलांसाठी एक शाळा सुरु केली होती.

मीडिया रिपोर्टनुसार सौंदर्या यांच्या लहानपणीच एका ज्योतिषाने सांगितले होते की, त्यांचा आकस्मिक मृत्य होईल. हे ऐकून त्यांच्या आई वडिलांनी मुलींसाठी अनेक होम हवन, पूजा केल्या. त्यांना कधीही ड्रायविंग शिकू दिली नाही. नेहमी त्यांच्यासोबत एक बॉडीगार्ड असायचा. सूर्यवंशम सिनेमाच्या वेळी त्यांना सांगितले होते की, हा सिनेमा त्यांच्या करियरसाठी नक्कीच चांगला असेल, मात्र कदाचित हा त्यांचा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा ठरू शकतो.

 

सौंदर्य यांनी त्यांच्या छोट्या १२ वर्षाच्या करियरमध्ये १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अशा मृत्यूनंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरच्या जास्त फी मागणीवर बोलली ‘द फॅमिली मॅन’ची प्रियामणि; म्हणाली, ‘यासाठी ती लायक…’

-‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरून पहिला व्हिडिओ व्हायरल; मजेदार अंदाजात नाचताना दिसले भारती, सुदेश अन् कृष्णा

-बोलके डोळे अन् निरागस चेहरा! ऋता दुर्गुळेच्या चेहऱ्यावर खिळल्या लाखो नजरा

हे देखील वाचा