फिल्म इंडस्ट्रीबाबत राजपाल यादवचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आर्थिक तंगी दरम्यान इंडस्ट्रीने मला…’


बॉलिवूडच्या विनोदी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे राजपाल यादव होय. ‘ढोल’ असो किंवा ‘भागम भाग’ हा चित्रपट असो, आपल्या प्रत्येक भूमिकेने त्याने सगळ्यांना आनंदित केले आहे. त्याच्या या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले आहे. एक काळ तर असा होता, जेव्हा फक्त त्याचे नाव ऐकूनच चित्रपट हिट होत असत. त्याने आपल्या करिअरची सुरुवात अनेक छोटे छोटे पात्र निभावून केली आहे. परंतु राम गोपाळ वर्मा यांच्या ‘जंगल’ चित्रपटाने त्याला खरी ओळख मिळाली. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांमुळे देखील प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. (Rajpal Yadav disclosure bollywood had supported me during financial crisis)

याआधी त्याने वरुण धवन आणि सारा अली खानसोबत ‘कूली नंबर १’ मध्ये काम केले आहे. नुकतेच राजपाल यादवने सांगितले आहे की, जेव्हा तो आर्थिक संकटाचा सामना करत होता, तेव्हा इंडस्ट्रीने त्याला खूप मदत केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार पाच कोटींचे कर्ज ना भरल्याने राजपाल यादवला २०१८ मध्ये जेल जावे लागले होते.

राजपाल हा खूप विनम्र आहे. फिल्मफेअरने रेडिओ जॉकीला दिलेल्या मुलाखतची एक बातमी छापून आली आहे. या बातमीनुसार अभिनेत्याने सांगितले की, त्याला माहित आहे की, त्याच्याकडे ती सपोर्ट सिस्टिम आहे ज्याची त्याला गरज आहे. तो म्हणतो की, “प्रत्येकाने दुसऱ्यासाठी आपले दरवाजे उघडे ठेवले पाहिजे. जर लोकांनी मला मदत केली नसती, तर मी इथपर्यंत कसं पोहचू शकलो असतो. संपूर्ण जग माझ्यासोबत होते. मी खूप विश्वासाने पुढे जातो. मला माहित होते माझ्याकडे ते सगळं काही होते ज्याची मला गरज होती.”

राजपाल यादवने मुंबईमधील त्याच्या मेहनतीच्या दिवसांचा उल्लेख देखील केला. तो म्हणाला की, “तुम्ही मुंबईमध्ये येता. एका नवीन अनोळखी शहरात तुम्ही बोरावलीला जाण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीसोबत ऑटोमध्ये बसता. जेव्हा तुमच्याकडे ऑटोने जाण्यासाठी पैसे नसतात, तेव्हा तुम्ही पायी जुहू, लोखंडवाला, आदर्शनगर असा प्रवास करता. यशाच्या शोधात तुम्ही तुमचा फोटो घेऊन फिरत असता. जर आयुष्य कठीण वाटत असेल, तर तुमचे मिशन सोप्पे होते. जेव्हा आयुष्य सोप्पे वाटते तेव्हा मिशन कठीण होते.”


तो राजपाल यादव शिल्पा शेट्टी आणि मिजानसोबत ‘हंगामा ३’ या आगामी चित्रपटांत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरच्या जास्त फी मागणीवर बोलली ‘द फॅमिली मॅन’ची प्रियामणि; म्हणाली, ‘यासाठी ती लायक…’

-‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरून पहिला व्हिडिओ व्हायरल; मजेदार अंदाजात नाचताना दिसले भारती, सुदेश अन् कृष्णा

-बोलके डोळे अन् निरागस चेहरा! ऋता दुर्गुळेच्या चेहऱ्यावर खिळल्या लाखो नजरा


Leave A Reply

Your email address will not be published.