रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज; लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार टीव्हीची ‘किन्नर सून’


‘बिग बॉस १४’ ची विजेती आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर रुबीना खूपच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंचा तडका ती नेहमीच सोशल मीडियावर दाखवत असते. तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. सोशल मीडियावरील तिच्या कोणत्याही फोटोवर नजर टाकल्यास आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे तिच्या प्रत्येक फोटोवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव होत असतो. (Rubina dilaik will enter in bollywood with hiten tejwani)

यातच रुबीना आणखी एकदा जोरदार चर्चेत आली आहे. ती आता तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन आली आहे. जी ऐकून तिचे चाहते खूपच खुश होणार आहेत. ती बातमी म्हणजे रुबीना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काय?? बसला ना आश्चर्याचा धक्का?? आतापर्यंत छोट्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रुबीना, आता बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. रुबीना लवकरच ज्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याची शूटिंग चालू करणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या बातम्या येत होत्या. पण आता या गोष्टीची अधिकृत घोषणा झालेली आहे. अभिनेता तरुण आदर्श याने एक ट्वीट करून रुबीना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा खुलासा केला आहे. त्याने लिहिले आहे की, “रुबीना दिलैक बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. संगीतकार पलाश मुच्छल हा चित्रपट बनवणार आहे. तिने हा चित्रपट साईन केला आहे.”

त्याने पुढे लिहिले आहे की, “रुबीना सोबत पलाशने टीव्ही अभिनेता हितेन तेजवानी याला देखील साईन केले आहे. या दोघांसोबत राजपाल यादव देखील या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची शूटिंग सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू होणार आहे.” हे वाचल्यावर रुबीनाचे चाहते खूपच खुश झाले आहेत. या पोस्टवर प्रतिक्रिया देऊन ते त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत.

रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती : अस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानीया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरच्या जास्त फी मागणीवर बोलली ‘द फॅमिली मॅन’ची प्रियामणि; म्हणाली, ‘यासाठी ती लायक…’

-‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरून पहिला व्हिडिओ व्हायरल; मजेदार अंदाजात नाचताना दिसले भारती, सुदेश अन् कृष्णा

-बोलके डोळे अन् निरागस चेहरा! ऋता दुर्गुळेच्या चेहऱ्यावर खिळल्या लाखो नजरा


Leave A Reply

Your email address will not be published.