इतर स्टारकिड्सप्रमाणे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. सोशल मीडियावरही तिचा चांगलाच वावर आहे. यामार्फत ती देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले परखड मत मांडत असते. ती आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर करते. अशातच आता तिने आपला एक नवीन फोटो शेअर केला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नव्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोत ती मुंबईच्या सोनेरी सायंकाळचा आनंद लूटताना दिसत आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिचे स्मितहास्यही खूप गोड दिसत आहे. (Big B Grand Daughter Navya Naveli Nanda Enjoys A Golden Sunset From Her Terrace See Her Latest Photo)
या फोटोत नव्याने काळ्या रंगाचा टी- शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. सोबतच तिने लाल रंगाचे जॅकेटही परिधान केले आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये सूर्याच्या इमोजीचा समावेश केला आहे. तिच्या या पोस्टला आतापर्यंत ५० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.
तिच्या या पोस्टवर चाहते आणि फॉलोअर्ससह तिच्या जवळच्या मित्रांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मैत्रीण खुशी कपूरनेही तिच्या फोटोवर कमेंट करत “क्यूटी” लिहिले आहे. दुसरीकडे महीप कपूरनेही एक इमोजी कमेंट केला आहे.
नव्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, यावेळी ती अभिनयाबाबत कोणताही विचार करत नाही. ती आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात हातभार लावू इच्छिते. आपल्या वडिलांच्या व्यवसायात ती चौथी पिढी असेल, जी हे सांभाळण्याचे काम करेल. सोबतच ती हे काम करणारी पहिली महिलाही असेल. नव्या जरी चित्रपटात काम करत नसली, तरीही सोशल मीडियावर तिची फॉलोविंग जबरदस्त आहे.
नव्याचा मित्रपरिवार हा पूर्णपणे चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी भरलेला आहे. तिच्या मित्रमंडळींच्या यादीत सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे अनन्या पांडेचे. त्यानंतर तिला जान्हवी कपूर, खुशी कपूर यांच्यासह इतर अनेक मित्रमंडळी आहेत. यासोबतच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही नव्याचा चांगला मित्र आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती
-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा
-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद