Tuesday, June 18, 2024

‘एमसी स्टॅन’ला लोकांनी ट्रोल केल्यानंतर शिव ठाकरे म्हणाला, ‘ज्या गोष्टीवर ज्याचा हक्क…’,

सध्या बिग बॉस हा वादग्रस्त शो ‘ठरला आहे. ‘सध्या बिग बॉस’ 16 व्या सिझन ची जोरदार चर्चा चालू आहे. नुकताच हा शो संपला आहे. एमसी स्टॅन हा सिझनचा विजेता ठरला. यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. कारण शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरी ह्या दोघांपैकी एकाला विजेत्यापदासाठी पात्र मानले जात होते. त्यामुळे एमसी स्टॅन ला ट्रोल केले जात आहे. शिव याला जेव्हा एमसी स्टॅन बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सडेतोड उत्तर दिले.

शिव ठाकरे (Shiv Thakare) एमसी स्टॅन (MC Stan) बद्दल म्हणाला ” तो एका वस्तीतून आला आहे. तो एकदम रॉ आहे. प्रेक्षकांबरोबर तो सहज कनेक्ट झाला. मनापासून खेळाला. त्याने स्वतःसाठी काधिच ट्रॉफीचा विचार केला नाही. त्याला मी जिकावे असे वाटत होते. तो लोकांची मन जिकंण्यासाठी आला होता. तो त्या ट्रॉफिसाठी पात्र आहे.

मी त्याच्या साठी खूप खुश आहे. ‘बिग बॉस’16 (Big Boss 16) मध्ये असताना तो नेहमीच मनापासून खेळत राहिला. मनापासून बोललेलें प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचलं. ज्या गोष्टीवर ज्याचा हक्क असतो ती त्यालाच मिळावी पाहिजे. जर तो खेळ समजून ट्रॉफी जिंकला असेल तर विचार करा की तो चार महिने गेम खेळला असता तर किती राडे झाले असते.”

बिग बॉस १६ विजेता एमसी स्टॅनचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. पण त्याने शो मध्ये चांगला परफॉर्मन्स न करता त्याने ही ट्रॉफी कशी जिकंली असावी असा प्रश्न काही लोकांकडून उपस्थित करण्यात आला होता. कारण सुरुवातीला त्याला खेळ समजलाच नव्हता. पण जेव्हा शोच्या अखेरीस त्याला खेळ समजला. तो खूप सक्रिय झाला. आणि त्याची उघडपणे बोलू लागला होता. त्याच व्यक्तिमत्त्व लोकांना आवडल. मग काय विजेता होण्यास त्याला कोणी अडवू शकलं नाही. (big-boss-16-winner-mc-stan-shiv-thakare-angry-on-people-trolling-mc-stan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आईच्या सांगण्यावरून साईन केला ‘हा’ चित्रपट; करिश्माने केला मोठा खुलासा
आधीच अफेअरच्या चर्चा, त्यात सोशल मीडियावर पोस्ट करत ‘अनन्याने’ माजवली खळबळ; एकदा वाचाच

हे देखील वाचा