Sunday, April 26, 2026
Home मराठी शेवंता पुन्हा येतेय चाहत्यांच्या भेटीला, पोस्ट शेअर करत सांगितलं नव्या चित्रपटाचं नाव

शेवंता पुन्हा येतेय चाहत्यांच्या भेटीला, पोस्ट शेअर करत सांगितलं नव्या चित्रपटाचं नाव

मराठी वाहिनीवरुन ‘रात्रीस खेळ चाले‘ या मालिकेतून शेवंता म्हणून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर खूपच चर्चेत असते. बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी याच्या अजूनही चर्चा सुरुच आहेत. यंदाची सर्वधिक आघाडीची सदस्या म्हणून अपूर्वाकडे पाहायले जायचे मात्र, अक्षय केळकर याने बाजी मारली पण तरीही अनेक चाहते अपूर्वालाच पाठिंबा देत आहे. नुकतंच अभिनेत्रीने एक घोषणा केली आहे.

शेवंता उर्फ अपूर्व नेमळेकर (Apurva Nemlekar) अभिनया सोबतच तिच्या हटके लूकसाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच अपूर्व सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग आहे. सतत नवनवीन फोटो शेअर करत प्रेक्षाकाचे लक्ष वेधनारी शेवंता लवकरच एका शॉर्ट फिल्म मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘द डिलिव्हरी बॉय’ नावाच्या शॉर्ट फिल्मचे स्वयंभू स्टुडिओजने निर्मिती केली आहे. अपूर्वाने बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

बिग बॉसमध्ये अपूर्वाचे स्पष्ट बोलणे खेळाडू वृत्ती आणि बेधडक अंदाज त्यामुळे अनेक चाहत्यांना अपूर्वाच विजेत ठरेल असे अपेक्षित होते मात्र, ऐन वेळेवर अक्षयने बाजी मारली आणि बिग बॉस 4 ची ट्रॉफी पटकवली. पण अपूर्वा मोकळीच आली नाही तर तिच्या सोबत यशाची किल्ली घेऊन आली.

 

View this post on Instagram

 

अपूर्वाने मराठी मधील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, ‘रात्रीस खेल चाले’ या मालिकेमुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. आता बिग बॉसमुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये अजूनच वाढ झाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

बॉलिवूड कलाकारांच्या मानधनावर भूषण कुमार यांचे परखड वक्तव्य; म्हणाले, ‘मी आता अशा अभिनेत्यांबरोबर…’
गोल्डन ग्लोब अवॉर्डनंतर ‘आरआरआर’च्या नावावर अजून एक पुरस्कार, वाचा काय केली कामगिरी

हे देखील वाचा