Friday, January 27, 2023

‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंता अडकली लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये लग्नाचा सिजन सुरु झाला आहे. हिंदी असो किंवा मराठी एका पाठोपाठ अनेक सेलिब्रिटींनी लग्न सोहळा उरकला आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनंतर, अनेक जोडप्यांनी त्यांच्या नात्याला लग्नबंधना अडकवले आहे. त्याशिवाय यांचे फोटोधेखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्या यादीमध्ये अजून एका जोडप्याने नाव नमुद झाले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंता म्हणजेच कृतिका तुळसकर  लग्नबंधनात अडकली आहे.

रात्रीस खेळ चाले‘ (Ratris Khel Chale) फेम अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) हिने दिग्दर्शक विशाल देवरुखकर (Vishal Devrukhkar) याच्यासोबत (दि,14 डिसेंबर) रोजी विवाह सोहळा थाटामाटात उरकला आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन लग्नाचे काही फोटो शेअर करत त्यासोबत तिने भन्नाट कॅप्शनमध्ये लिहिले की, “आता ही व्यक्ति संपूर्ण मालकी हक्कानी माझी.”

दुसरीकडे विशाल देवरुखकरने याने भांगेत कुंकू भरत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच कृतिकानेही  सप्तपदी घेत असतानाचा एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टग्रामवर शेअर केला आहे. तिने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये कपड्यांबद्दल सांगित लिहिले की, “सप्तपदी….आमच्या लग्नात मी आणि विशाल ने जे काही सुंदर कपड़े परिधते दीपा ने आमच्या मैत्रीनी ने बनवले होते .तीला काही सांगायची गरजच आम्हाला लागली नाही .तिने आमचा स्पेशल डे अजून स्पेशल बनवला.आमचे सगळे लग्नाचे कपड़े स्वतःच्या हाताने आणि प्रेमाने तयार करण्यासाठी खुप खुप खुप थँक यू… तुम्ही तिच्या बुटीक ला जाऊन खुप छान कपडे बघू शकता आणि तुमच्या स्पेशल डे ला खुप सुंदर दिसू शकता”, अशाप्रकारे तिने तिच्या मैत्रिणिचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

या जोडप्याची पहिली भेट मराठी सिनेसृष्टीत काम करत असताना झाली होती. हळूहळू दोघांची ओळख झाली, ओळखीनंतर मैत्री वाढली आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. अनेक दिवसांपासून हे एकमेकांना डेट करत शेवटी त्यांनी आपल्या नात्याला नाव दिले आणि मराठमोठ्या पद्धतीने त्यांनी लग्न सोहळा उरकवला.

 

View this post on Instagram

 

अभिनेत्री कृतिका तुळसकर रात्रीस खेल चाले मालिकेत शेवंता नावाचे पात्र करत असून तिच्या दमदार अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. विशाल देवरुखकर याने ‘गर्ल्स’, ‘बॉईज’, बॉईज २ आणि आता ‘बॉईज 3’ सारख्या गाजणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यापूर्वी त्याने एकांकी देखिल केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आनंदाची बातमी! राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवींंद्र घेऊन येतेय ‘हा’ अभंग
अरे व्वा! टीना आणि राहुल पुन्हा एकत्र, सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

हे देखील वाचा