आनंदाची बातमी! अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ‘या’ दिवशी थिएटरमध्ये होणार रिलीझ


चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे ‘खिलाडी’ अक्षय कुमार होय. तो नेहमीच आपल्या चित्रपटांनी चाहत्यांना आकर्षिक करत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जी वाचून तुम्हालाही आनंद झाल्यावाचून राहणार नाही.

अक्षय कुमारच्या आगामी ‘बेल बॉटम’ या चित्रपटाची आतुरता आता संपली असून हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय हा असा पहिला अभिनेता आहे, ज्याच्या ‘बेल बॉटम’ हा चित्रपट लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. प्रेक्षकांना आता त्याच्या झलक थेट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २७ जुलै, २०२१ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने केली पोस्ट शेअर
आपला चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार, याची माहिती अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना दिली आहे. तो म्हणाला की, “मला माहिती आहे की, तुम्ही बेल बॉटम चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आतुरतेने वाट पाहिली आहे. मात्र, शेवटी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करून मला आनंद होऊ शकत नाही. जगभरातील मोठ्या पडद्यावर २७ जुलैला येतोय.”

अक्षयच्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दीर्घ काळापासून अक्षयचा कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला नाही. अशामध्ये ‘बेल बॉटम’ आता चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो वेगळ्याच भूमिकेत दिसणार नाही.

या चित्रपटाची शूटिंग खूप आधीच झाली आहे. मागील वेळी लॉकडाऊननंतर अक्षयने चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.

नुकतेच असे वृत्त आले होते की, अक्षयने ‘बेल बॉटम’ चित्रपटासाठी आपले मानधन ३० कोटी रुपयांपेक्षाही कमी करण्यावर संमती दर्शवली होती. मात्र, अक्षयने या वृत्ताला नाकारले होते.

चित्रपटाचा टिझर काही काळापूर्वीच रिलीझ करण्यात आला होता. हा चित्रपट १९८० च्या काळावर आधारित आहे. ज्यामध्ये अक्षय एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या लूकमध्ये तो एकदम दमदार दिसत आहे. टिझरमध्ये अक्षय वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला होता. चित्रपटात अक्षयव्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता आणि आदिल हुसैन दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स

-व्वा! अभिनेत्री वनिता खरातने घेतली पहिली कार, फोटो शेअर करून लिहिले ‘स्वप्नपूर्ती’


Leave A Reply

Your email address will not be published.