व्वा! अभिनेत्री वनिता खरातने घेतली पहिली कार, फोटो शेअर करून लिहिले ‘स्वप्नपूर्ती’


आजकाल प्रत्येकाचे एक स्वप्न असते. ते स्वप्न उराशी बाळगून सगळेजण त्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास करत असतात. अगदी कोणताही सामान्य व्यक्ती असो किंवा चित्रपट सृष्टीतील कुणी कलाकार. प्रत्येकाचे आयुष्यात काही ना काही स्वप्न असते. पण जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते. मात्र, आपला गगनात मावत नसतो. यातही अनेकांची स्वप्न ही एक चांगले घर व गाडीतर नक्कीच असते. घर पाहावे बांधून व जीवनाला चार चाक लागली असे डायलॉग आपण सर्रास ऐकतो. याला कलाकारही अपवाद नसतात. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांचीही अशीच काहीशी स्वप्न असतात. काहींची ती लवकर पुर्ण होतात तर काहींना वेळ लागतो. अभिनेत्री वनिता खरात हीचेही असेच एक स्वप्न पुर्ण झाले आहे.

अभिनेत्री वनिता खरात हिने नुकतेच तिच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये ती एका गाडी सोबत दिसत आहे. वनिताने तिची स्वतःची नवीन कार खरेदी केली आहे. या गाडीसोबत फोटो तिने फेसबुकवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “इच्छा पूर्ती.” ही तिच्या आयुष्यातील पहिलीच कार आहे. तिच्या या फोटोवर सगळे कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत.

तीने ह्युंडाई ऑरा सेदान ही गाडी घेतली आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत ५.५० लाखांपासून ते ९.५० लाखांपर्यंत आहे.

काही दिवसांपूर्वी वनिता तिच्या न्यूड फोटोमुळे खूप चर्चेत आली होती. तिने तिचे काही न्यूड फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. यावर युजरने तिला ट्रोल केले होते. यानंतर बरेच दिवस ती चर्चेत होती.

वनिताने 2019 साली ‘विकी वेकिंगर’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच तिने शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात ती शाहिद कपूरची कामवाली बाई दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारने चित्रपटाची फी कमी केली?? पसरलेल्या या बातम्यांना अभिनेत्याने ‘अशाप्रकारे’ दिले सडेतोड उत्तर

-सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्ती झाली भावुक; म्हणाली, ‘तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही…’

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.