Thursday, June 18, 2026
Home बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी येणार नवीन पाहुणा? अभिनेत्रीने थांबवले चित्रपटाचे काम

अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी येणार नवीन पाहुणा? अभिनेत्रीने थांबवले चित्रपटाचे काम

अभिनेत्री काजल अग्रवालने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेकदा काजल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करते. ती चाहत्यांशी स्वतः विषयीच्या अनेक गोष्टी शेअर करताना दिसत असते. काजल नुकतेच गौतम किचलूसोबत विवाह बंधनात अडकली आहे. मात्र, तिच्या प्रेग्नंसीविषयी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे की, तिच्या घरी लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे.

काही दिवसांपासून काजल ‘आचार्य’ चित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. काजलला स्टंट सीन शूट करायचा आहे. त्यामुळे तिने स्टंट सीनसाठी खास ट्रेनिंगही घेतली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, काजलने सर्व काम थांबवले आहे. तसेच तिने सध्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच सध्या तिच्या प्रेग्नंसीविषयी चर्चा रंगली आहे. असे म्हटले जात आहे की, काजलने प्रेग्नंसीमुळे ‘घोस्ट’च्या निर्मात्यांना काम थांबवण्यास सांगितले आहे आणि निर्मात्यांनी सहमतीही दर्शवली आहे. मात्र, तिने प्रेग्नंसीविषयी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काजल सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिच्या काही पोस्ट प्रचंड व्हायरल होत होत्या, पण आता काजल प्रेग्नंट असल्याच्या काही बातम्या प्रचंड व्हायरल होत आहे. काजलची लव्हस्टोरी आणि त्यानंतर लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसते. तिने अनेक मुलाखतीत सांगितले आहे की, “गौतम आणि मी पूर्वी चांगले मित्र होतो.” त्यानंतर ३ वर्षे ते एकमेकांना डेट करत होते.

काजलविषयी बोलायचे झाले, तर काजल गेली १६ वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने ‘क्यूँ! हो गया ना…’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. यासोबतच तिचे हिंदी चित्रपटांमध्ये चांगले चाहते आहेत.

हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तिला अजय देवगणच्या ‘सिंघम’मधून विशेष ओळख मिळाली. यानंतर तिला ‘सिंघम गर्ल’ म्हटले गेले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा