संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ‘ॲनिमल’ हा 2023 सालातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. त्याचवेळी त्याचा सिक्वेल ‘ॲनिमल पार्क’ पहिल्या भागात जाहीर झाल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ‘ॲनिमल पार्क’ला उशीर होणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या, मात्र आता याबाबतच्या नव्या अपडेटने चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह वाढवला आहे.
संदीप रेड्डी वंगा पॅन इंडिया स्टार प्रभाससोबत ‘स्पिरिट’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर 2026 मध्ये सिक्वेलचे शूटिंग सुरू होईल असे सांगण्यात आलेले आहे. संदीप सध्या ‘स्पिरिट’च्या स्क्रिप्टिंगमध्ये व्यस्त आहे, ज्याची निर्मिती 2024 च्या उत्तरार्धात सुरू होणार आहे.
एका मीडिया रिपोर्टमध्ये एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘स्पिरिटनंतर ॲनिमल पार्कचे शूटिंग सुरू करण्यासाठी संदीप खूप उत्सुक आहे. संदीपने ॲनिमल पार्कच्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे.ॲनिमलमधील अनेक प्रमुख पात्रे देखील ॲनिमल पार्कचा एक भाग असतील. रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी आपापल्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर उपेंद्र लिमये यांचाही ॲनिमल पार्कमध्ये मजबूत ट्रॅक आहे. अनेक नवीन कलाकारांची नावेही सिक्वेलमध्ये जोडली जाणार आहेत.
ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ॲनिमल’चा बहुप्रतिक्षित सिक्वेल आणण्यासाठी संदीप रेड्डी वंगा आणि भूषण कुमार यांनी हातमिळवणी केली आहे. टी सीरीजच्या अधिकृत पेजवर ही बातमी शेअर करण्यात आली, ‘ही विश्वासावर बांधलेली भागीदारी आहे, सर्जनशील स्वातंत्र्याने प्रेरित आहे आणि अतूट बंधनाने मजबूत केली आहे.’
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘दोघीही उत्तम अभिनेत्री आहेत…’, क्रिती सेननने शेअर केला ‘क्रू’मध्ये करीना-तब्बूसोबत काम करण्याचा अनुभव
‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर विजय कोंडके यांचा नवा चित्रपट भेटीला ‘लेक असावी तर अशी’