Thursday, April 18, 2024

Ranbir Kapoor Instagram Account | मीडियाने शोधून काढले रणबीर कपूरचे सिक्रेट इंस्टाग्राम अकाउंट, ‘हा’ आहे अभिनेत्याचा युजर आयडी

Ranbir Kapoor Instagram Account | मागील ‘ॲनिमल’ या चित्रपटासाठी कौतुकाचा वर्षाव करणारा रणबीर सध्या सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अनेक दिवसांपासून तो सोशल मीडियापासून दूर असल्याची त्याच्या चाहत्यांना कल्पना आहे. मात्र, आता अलीकडेच युजर्सनी दावा केला आहे की, रणबीर एक सिक्रेट अकाऊंट चालवतो, ज्याची कोणालाही माहिती नाही.

रणबीर कपूर अनेक वर्षांपासून सोशल मीडियापासून दूर राहिला आहे, जरी युजर्सने दावा केला आहे की तो इंस्टाग्राम अकाउंट चालवतो. असे दिसते की आता अनेक सोशल मीडिया युजर्सला अभिनेत्याचे इंस्टाग्राम अकाउंट तसेच त्याचे पूर्वीचे (ट्विटर) खाते शोधले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार रणबीरचे इंस्टाग्राम अकाउंट हँडल ‘Reymar_1528’ असल्याचे बोलले जात आहे. या अकाऊंटला अभिनेत्याचा चांगला मित्र अयान मुखर्जीही फॉलो करतो. रणबीरच्या एक्स अकाऊंटबद्दल बोलताना, युजर्सनी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत त्याची मजेशीर धमालही शेअर केली होती.

काही युजर्सनी असेही सांगितले की हे अकाऊंट 2016 मध्ये तयार करण्यात आले होते, जेव्हा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टने डेट करण्यास सुरुवात केली होती आणि ब्रह्मास्त्रचे शूटिंग सुरू होते. खात्यात दोन नंबर आहेत – 15 आणि 28 जे आलिया आणि रणबीरच्या जन्मतारीख आहेत (15 मार्च आणि 28 सप्टेंबर)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रकुल प्रीतने केली ‘चौका चारधाना’ची परंपरा पूर्ण, सासरी बनवला ‘हा’ गोडाचा पदार्थ
Prathamesh Parab Wedding : शुभविवाह संपन्न! प्रथमेश परबच्या लग्नाचे खास क्षण

हे देखील वाचा