बिग बॉस चौदाच्या विजेत्या रुबीना दिलैकची लव्ह स्टोरी अशी झाली होती सुरु, पुढे अनेक संकटातून काढला मार्ग


बिग बॉसच्या घरातील रुबीना दिलैकने बिग बॉस २०२१ अर्थात १४व्या सिझनवर आपले नाव कोरले. तिला तब्बल ३६ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तिच्या सोबत तिचा पती अभिनव शुक्लाही शोमध्ये होता, जो काही दिवसांपूर्वीच शोमधून आऊट झाला होता आणि बिगबॉसच्या घरातून बाहेर पडला होता. शोमध्ये प्रेक्षकांना या जोडप्याची जवळीक, दुरावा सर्व काही पाहायला मिळाले. पण तुम्हाला माहित आहे का, की रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांची लव्हस्टोरी कोठे, केव्हा आणि कशी सुरू झाली. तुम्हाला माहित नसेल तर मंडळी दैनिक बोंबाबोंबच्या वाचकांसाठी आम्ही आज हा खास लेख घेऊन आलो आहोत.

आपण रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांना अनेक वेळा घरात प्रेम करताना तसेच, एकमेकांवर चिडताना पाहिले आहे. इतकेच नव्हे तर रुबीनाने एका टास्कच्या वेळी आपल्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा करून सांगितले होते की, “बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी मी आणि अभिनव घटस्फोट घेणार होतो; पण आता आम्ही ते घेणार नाही. या घराने मला खूप काही दिले आहे”.

ते म्हणतात ना की खऱ्या प्रेमाची कधीही हार होत नाही, या जोडप्यामध्येही असेच घडले. रुबीना आणि अभिनवची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या झाली होती. एका मुलाखती दरम्यान अभिनव म्हणाला होता की, मी जेव्हा रुबीनाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिने एक सुंदर साडी परिधान केली होती. आम्ही जवळपास दीड वर्ष एकमेकांना ओळखत होतो. आम्ही सोबत असण्याचे मुख्य कारण असे की आमचे विचार खूप जुळायचे. जसे आम्ही दोघेही फिटनेस फ्रिक आहोत आणि प्रवास करणे आमचा छंद आहे.

त्याचवेळी रुबीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, “आमचे बोलणे एका फोटोद्वारे सुरू झाले होते. अभिनवने माझ्या एका फोटोला कमेंट केली आणि म्हणाला, “मला तुमच्यासोबत शूट करण्याची संधी मिळेल का?” मग मी या फोटोशूटला होकार दिला आणि आम्ही फोटोशूट केले. कालांतराने आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ लागलो. त्यानंतर आमचे प्रेम सुरू झाले. मग आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.