अभिनेता सलमान खानच्या ‘बिग बॉस १५’ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणारा आणि आपल्या बिनधास्त विधानांसाठी ओळखला जाणारा अभिजीत बिचकुले नुकताच शो बाहेर पडला आहे. त्यानंतर अभिजीतने माध्यमांशी बोलताना सलमानविरोधात अनेक गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आता तो चर्चेचा विषय ठरत आहे. “सलमान खानला (Salman Khan) कोणाचही चांगलं झालेलं बघवत नाही, त्याचा २० वर्षांचा इतिहास बघा, स्वतःला काय समजतो,” अशा शब्दांत अभिजीतने सलमानवर शाब्दिक वार केले आहेत. शोमधून बाहेर पडताच अभिजीतच्या ( Abhijit Bichukale) संतापाचा स्फोट झालेला दिसत आहे.
अभिजीत बिचुकले म्हणाला की,”बिग बॉसच्या घरात मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला. सलमानने माझ्यावर व्यक्त केलेला राग न शोभणारा आहे. सलमानने १४ शो चालवले. त्याला वाटतं की तो शो चालवतो, मात्र हा १५ वा शो मी चालवला, आणि इथे तो कमी पडला. त्याने जी भाषा वापरली ती आजपर्यंत मला कोणी वापरली नाही. पिंजऱ्यात वाघ आहे म्हणून तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईन की मी काय आहे. त्याच्यासारखे १०० सलमान मी गल्ली झाडायला उभे करील.”
“सलमान खान अजून अंड्यात आहे. त्याला अजून अंड्यातून बाहेर यायचं आहे. ज्या जनतेनं मला प्रेम दिलं त्या जनतेच्या जिवावर सलमान उड्या मारतो. मी या शोमधून बाहेर पडणारच होतो. मला अशा शोची गरज नाही. मला त्यांनी थांबण्याची विनंती केली. त्यामुळे मी थांबलो. त्यांना माझी गरज होती, त्यांनी बोलावलं म्हणून मी बिग बॉसमध्ये गेलो,” असेही अभिजीत बिचुकले म्हणाला आहे.
त्याचबरोबर ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान बिचुकलेवर अनेकदा वैतागला होता. “बिचुकले, तुम्ही घरात ज्या घाणेरड्या शिव्या देतात. जर त्याच शिव्या तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला दिल्या तर कसं वाटेल? शेवटचं सांगतोय, जर पुन्हा असं झालं तर घरात येऊन तुला मारेन. इतकंच नाही तुझ्या केसांना पकडून घरातून फरफटत तुला बाहेर काढेन लक्षात ठेव.” हिंदी बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी अभिजीत बिचुकले मराठी बिग बॉसमध्ये दिसला होता.
हेही वाचा :