Wednesday, March 22, 2023

‘दृश्यम’ चित्रपटात अनुची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘ही’ बालकलाकार झालीये मोठी, पाहून व्हाल थक्क

‘दृश्यम’ हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. थरारक आणि रहस्यमय चित्रपटावर लोकांनी खूप प्रेम व्यक्त केले होते. या चित्रपटाने खूप अवॉर्ड आपल्या नावावर केले होते. चित्रपटात मुख्य भूमिकेत अजय देवगण, श्रिया शरण आणि तब्बू दिसून आले होते. चित्रपटामध्ये सुपरस्टारच्या अभिनयासोबतच लोकांना अजय देवगण आणि श्रिया शरण यांच्या मुलांचा अभिनय सुद्धा फार आवडला होता. जास्त करून चित्रपटातील अजय देवगणची छोटी मुलगी अनु म्हणजे ‘मृणाल जाधव’ ने आपल्या उत्तम अभिनयाने खूप धूम केली होती. तुम्हाला जाणून विश्वास नाही बसणार की, त्या चित्रपटातील अनु आत्ता मोठी झाली आहे .

हो. मृणाल आत्ता मोठी झाली आहे, आणि तिचा चेहरा सुद्धा खूप बदलला आहे. मृणाल जाधव चा आताचा एक फोटो इंटरनेटवर खूपच चर्चेत आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत .मृणालचा हा फोटो बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीय की, ‘दृश्यम’ चित्रपटातील अजय देवगणची छोटी मुलगी अनु आत्ता एवढी मोठी आहे सुंदर झाली आहे. मृणालचा जो फोटो बाहेर आलेला आहे त्याचात तुम्ही तिला हातात माईक घेऊन बोलताना पाहू शकता. हा फोटो तिच्या कोणत्यातरी मुलाखती दरम्यानचा दिसत आहे. खुल्या केसात तीचे सौंदर्य बघताच जाणून येत आहे.

 

‘दृश्यम’ चित्रपटात मृणाल जाधवने आपल्या अभिनयाने खूपच हैराण करून सोडलं होत. एवढ्या छोट्या वयात एवढी उत्तम कलाकारी बघितल्यावर सगळे स्वतःला तिचे कौतुक करण्यापासून रोखू शकत नाहीत. मृणाल ही प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांची मुलगी आहे. तिने अनेक चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा