‘बिग बॉस १५’ आता नवव्या आठवड्यात पोहोचला आहे आणि यावेळी वाईल्ड कार्डच्या एन्ट्रीने घरातील अनेक समीकरणे बदलताना दिसत आहेत. राखी सावंतने लग्नाच्या दोन वर्षांनंतर ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच आपल्या पतीचा चेहरा प्रेक्षकांना दाखवला. तर पती रितेश पहिल्या दिवशी शांत राहिला, पण जेव्हा उमरने त्याच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, वेळ आल्यावर रितेश त्याची ठाम भूमिका घेऊ शकणार नाही. तेव्हा उत्तर देताना रितेश म्हणाला की, “जेव्हा नवीन नवरी घरात येते, तेव्हा ती आधी सर्वांना पाहते आणि नंतर ऍक्शन करते.”
करण- तेजस्वीवर साधला निशाणा
रितेशचे हे उत्तर कुटुंबीयांसह पाहुणे म्हणून आलेल्या रवी किशन आणि रवी दुबे यांनाही आवडले. मात्र, दुसऱ्याच दिवशी राखीच्या शांत पतीचे उग्र रूप पाहायला मिळाले. त्याने तेजस्वी आणि करणच्या नात्यावर निशाणा साधला आणि ते दोघे फक्त गेमबद्दल बोलतात असे म्हटले. ज्यानंतर करणने बदला घेत रितेशला ‘कायर’ असा टॅग दिला आणि दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. (bigg boss 15 rakhi sawant and her husband ritesh argument for game plan he shares his strategy)
राखीने रितेशला समजावली ‘ही’ गोष्ट
रितेश खूपच लवकरच आपल्या शत्रुत्वाचे पत्ते सर्वांसमोर उघडत असल्याचे राखीला वाटत आहे. म्हणून राखीने रितेशला प्रेमाने बोलवले आणि म्हणाली, “ऐक, इथे उभा राहा, मी तुला सर्वांशी वैर करू नकोस असे सांगितले होते. पण तू तसेच केलेस. त्यानंतर रितेशने राखीचे बोलणे मध्येच थांबवले आणि तिला म्हणाला की, “मला सर्व काही समजते.”
‘तुझ्या पुढे आहे मी, तू गप्प राहा’
राखीवर चिडून रितेश म्हणाला की, “मी तुझ्यापेक्षा शंभर टक्के पुढे आहे, तू गप्प बस. तू तुझे कर.” त्यानंतर राखी म्हणाली की, “मी काही सांगत असताना ऐकत जा.” ज्याला उत्तर देताना रितेश म्हणाला की, “मला सर्व काही समजले आहे.”
करणनंतर उमर रियाझसोबत झाले भांडण
करण आणि तेजस्वीशी भांडण झाल्यानंतर, रितेशने उमर रियाझसोबतही भांडण केले. दुसरीकडे, ‘मराठी बिग बॉस’चा स्पर्धक अभिजीत बिचकुले याने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने उमरचा बेड मागितला. मात्र, उमरने बेड देण्यास स्पष्ट नकार दिला. या दरम्यान उमरचा राखीसोबत वाद झाला आणि रितेश त्यांच्यामध्ये आला. त्यानंतर रितेशसोबतही उमरचा मोठा वाद झाला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री
-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती