Tuesday, June 25, 2024

ओहो… क्या बात है! राखी सावंतच्या पतीची ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री, पतीची आरती करत पडली पाया

अभिनेत्री राखी सावंत ही ‘बिग बॉस’मधील सर्वात जास्त मनोरंजन करणारी स्पर्धक ठरली आहे. प्रेक्षकांना ती एवढी आवडते की, या शोचे निर्माते प्रत्येक पर्वात तिला बोलावतात. बिग बॉसच्या मागील पर्वात देखील राखीने खूप मनोरंजन केले होते. आता या पर्वात देखील राखीला पुन्हा एकदा बोलावले आहे.

प्रत्येक वेळेस ती बिग बॉसमध्ये येताना एकटी येत नाही, तर अशा एका व्यक्तीला घेऊन येते, ज्या व्यक्तीला बघण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. जिथे राखी पहिल्यांदा नॅशनल टेलिव्हिजनवर तिच्या पतीची ओळख करून देणार आहे. यावेळी राखी म्हणते की, “सगळे असे म्हणतात की, राखीने लग्न केले नाही. ती खोटं बोलते ती केवळ लोकप्रियतेसाठी सगळं करते आता मी त्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं घेऊन आली आहे.” (Bigg boss 15 rakhi sawant enter at show with husbund )

या शोमध्ये येण्याआधी राखीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, लोकं तिच्यावर आरोप लावतात की, ती तिच्या पतीबद्दल खोटं बोलत आहे, परंतु आता ती बिग बॉसमध्ये तिच्या पतीला आणून सगळ्यांची बोलती बंद करणार आहे.

मागील पर्वात राखीचा पती रितेश याच्या एन्ट्रीबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. सगळेजण राखीच्या पतीला बघण्यासाठी उत्सुक होते, परंतु तेव्हा तो न आल्याने तिच्या लग्नाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी तिच्या पतीने सगळ्यांसमोर यायला नकार दिला होता.

बिग बॉसमध्ये आपण मागील आठवड्यात पाहिले आहे की, जय भानुशाली, नेहा भसीन आणि विशाल कोटियान यांना कमी व्होट मिळाले म्हणून एलिमिनेट केले. अचानक झालेल्या या एलिमिनेशने सगळेच हैराण झाले. या तीन स्पर्धकांनी या शोचा निरोप घेतला आहे.

अशातच या शोमध्ये राखी सावंतची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सगळेच आनंदी झाले आहेत. तिच्या येण्याने नक्कीच या शोमध्ये रंगत येणार आहे, यात काही वादच नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’

-अरे संसार संसार! मानसी नाईक सासरी करतीये चुलीवर चपात्या, व्हिडिओ झाला व्हायरल

-रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा