Monday, April 27, 2026
Home अन्य ‘ती मला आवडती, पण…’, जवळ येण्यापूर्वीच वाढू लागलंय करण अन् तेजस्वीमधील अंतर

‘ती मला आवडती, पण…’, जवळ येण्यापूर्वीच वाढू लागलंय करण अन् तेजस्वीमधील अंतर

‘बिग बॉस १५’ शो चौथ्या आठवड्यात पोहोचला आहे. अशामध्ये घरातील अनेक नातेसंबंध बिघडताना दिसत आहेत. आत्तापर्यंत जिथे प्रेक्षकांना घरात मायशा आणि ईशानची प्रेमकथा पाहायला मिळत आहे, तिथे प्रेक्षक तेजरान म्हणजेच तेजस्वी आणि करणला एकत्र पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील या दोघांची मस्ती आणि केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. करणने अकासासमोर कबूलही केलं की, तेजस्वी प्रकाशवर त्याचा क्रश आहे. मात्र, तेजस्वीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वाढू लागलंय दोघांमधील अंतर
पण जवळ येण्याआधीच या दोघांमध्ये अंतर येऊ लागलं आहे, असं दिसतंय. खरं तर तेजस्वीला करण कुंद्राच्या एका वागण्याचा खूप राग आला आहे. कॅप्टनसी टास्कला सहमती न मिळाल्यानंतर, करणने ओटीटीमधून आलेल्या शमिता, प्रतीक आणि निशांत यांच्याबद्दल कमेंट केली होती. “प्रत्येक निर्णयाच्या शेवटी हे तिघेही एक होतात आणि आपणही एक आहोत,” असं करणने म्हटलं होतं. याशिवाय करणने तिघांसाठी ओटीटी हा शब्द देखील वापरला. (bigg boss 15 tejasswi prakash gets irritated from karan kundrra actor says to akasa singh we are totally opposite)

करणला म्हणाली ‘कपटी’
याबद्दल बोलताना तेजस्वी करणला म्हणाली की, “तू सर्वांसमोर मोठमोठ्या कमेंट करतोस आणि त्यानंतर तू स्वतःच जाऊन निशांत आणि शमिताशी बोलतोस, ही गोष्ट मला खूप खराब वाटली.” तेजस्वीला करणचा खूप राग आला आणि ती म्हणाली की, “जर तुझं असं वागणं असेल, तर तू खूप कपटी आहेस.”

‘मी आंधळी नाहीये’
तेजस्वी प्रकाश करण कुंद्राला असेही म्हणाली की, “या घरात बरेच लोक तुला फॉलो करतात. परंतु मला हे थेट सांगायचे आहे की, हे माझ्याबरोबर चालणार नाही. कारण मी कोणाच्या बोलण्यात येत नाही. पण मी जे पाहते, तेच मी बोलते आणि मी आंधळी नाही. म्हणूनच मी तुला सांगतेय की, तू दोन्ही बाजूंनी जे खेळत आहेस, ते खूप चुकीचं आहे.” मात्र यावेळी करणने तेजस्वीशी वाद घातला नाही.

दु:खी झाला करण कुंद्रा
तेजस्वी हे सगळं बोलल्यानंतर करण कुंद्रा खूप दु:खी झाला. करण आधी तेजस्वीशी बोलताना म्हणाला की, “तू खूप ऐकवतेस.” त्यानंतर तो अकासाशी बोलताना दिसला. जिथे तो अकासाला म्हणाला की, “मला तेजस्वी समजत नाहीये. ती आणि मी पूर्णपणे वेगळे आहोत. आज मला खूप एकटं वाटतंय. मला ती आवडती, पण…”

तेजस्वीला म्हणाला, ‘मला खूप एकटं वाटतंय’
मात्र, करणने तेजस्वीकडे जाऊन तिला सांगितलं की, त्याला खूप एकटेपणा जाणवत आहे. यानंतर तो तेजस्वीला म्हणाला की, “तू माझ्याबद्दल असा विचार करते का?” करणला समजावताना तेजस्वी म्हणते, “असं मला आवडत नाही. तू तुझा प्राधान्यक्रम ठरव.” चाहत्यांना मात्र यांच्यातील दुरावा पाहून निराशा झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी

-आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून

-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’

हे देखील वाचा