Friday, May 24, 2024

लंडनमधील विराट आणि अनुष्काचा ‘तो’ फोटो व्हायरल; अभिनेत्री म्हणाली, “फूल ऍन्जाय..”

क्रिकेट आणि बाॅलिवूडच नात पहिल्यापासूनच जवळच आहे. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटरशी लग्न केली आहेत. यातीलच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा होय. अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबच विवाह केला आहे. त्या दोघांची जोडी खूप लोकप्रिय ठरली आहे. खुल्लम खुल्ला प्रेम जाहीर करणाऱ्या या जोडप्यचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होतात.

अनुष्का (Anushka Sharma ) सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे आणि विराटचे (Virat Kohli) फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्या दोघांच्या पोस्टवर चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर काही वेळातच खूप व्हायरल होतात.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टी ऍन्जाय करत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघे लंडनमध्ये ट्रिप ऍन्जाय करत असल्याचे बघायला मिळत आहे.

फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शन लिहिले की, “फूल ऍन्जाय” या फोटोत हे कपल हॉटेलऐवजी कारमध्ये दिसत आहे. यावरून विराट कोहली आणि अनुष्का मस्त फिरताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात हे जोडपे अमेरिकेलाही गेले होते. जिथे विराट आणि अनुष्काने अमेरिकेतील प्रसिद्ध गायक कृष्णा दास यांच्या कीर्तनातही भाग घेतला होता.

अभिनेत्री अनुष्का शर्मा विषयी बोलायच झाले तर, अनुष्का आगामी चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. अभिनेत्री अनुष्का भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. अनुष्का शर्माच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘चकडा एक्सप्रेस’ हे आहे. (‘That’ photo of actress Anushka Sharma and Virat Kohli went viral on social media)

अधिक वाचा-
 –‘आता खा आणि ओका…’, राज्यातील राजकीय भूकंपाबद्दल तेजस्विनी पंडितचं ट्वीट चर्चेत; लगेच वाचा
‘आता खा आणि ओका…’, राज्यातील राजकीय भूकंपाबद्दल तेजस्विनी पंडितचं ट्वीट चर्चेत; लगेच वाचा

हे देखील वाचा