Saturday, July 6, 2024

फटाके वाजवा रे! ‘बिग बाॅस 16’ला मिळाला विजेता, ‘या’ स्पर्धकाने उंचावली ट्रॅाफी

टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात विवादित शो म्हणून बिग बॉसचे नाव सर्वात पहिले घेण्यात येते. विवादित असूनही या शोला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळते. 1 ऑक्टाेंबर 2022ला बिग बॉसचे 16वे पर्व सुरु झाले. अनेक लहान मोठ्या कलाकारांनी या पर्वात सहभाग घेतला होता. हे नवीन पर्व अनेक वाद आणि भांडणांमुळे गाजले, यातही बिग बॉस कोण जिकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या मोठ्या प्रश्नाचे आज म्हणजेच रविवारी(दि. 12 फेब्रुवारी)ला उत्तर मिळाले. एमसी स्टॅन याने बिग बॉसच्या विजेत्यांची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

साेमवारी या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने जेव्हा एमसी स्टॅनचे नाव घेतले तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला. एमसी स्टॅन खूप चांगल्याप्रकारे हा खेळ खेळला. ताे कायमच स्वतःच्या डोक्याने आणि विचार करून खेळायचा. त्याने अनेकदा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे बिग बॉसला देखील अनेक प्रश्न विचारले. त्याच्या या हुशारीमुळे आज त्याने बिग बॉसचे विजेतेपद मिळवले आहे. एमसी स्टॅनला या ट्रॉफी सोबतच बक्कळ कॅश प्राईज देखील मिळाले आहे. (bigg boss 16 grand finale mc stan winner)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ‘या’ तारखेला हाेणार प्रदर्शित

राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

हे देखील वाचा