Tuesday, May 21, 2024

शालिन आणि एमसी स्टॅनच्या भांडणाने बिग बॉसच्या घराला बसला धक्का, ‘या’ अभिनेत्रीमुळे पेटली वादाची ठिणगी

प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस 16‘ मध्ये रोज काहीकरी नवीन पाहायला मिळत आहे. नुकतंच घरामध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्या भाडणाने घरातील प्रत्येक सदस्यालाच मोठा धक्का दिला होता. त्यामुळे अर्चनाला बोहेरचा रस्ता देखिल दाखवला होता. यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात असे काही घडले आहे, ज्यामुळे घरातील मोठा नियम मोडीत काढला आहे.

लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये गुरुवार (दि, 17 नोव्हेंबर) रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये खूप धमाकेदार गोष्टी पाहायला मिळाल्या. शालिन भनोट (Shalin Bhanot) आणि एमसी स्टॅन (MC Stan) यांच्या भांडनाने तर अनेक सदस्यांच्या अंगावर काटाच आला. आपल्या मित्राचा साथ देण्यासाठी शिव ठाकरे देखिल मागे सरकला नाही. त्यानेही शालिनला मारण्यासाठी हात उगारला मात्र, या सगळ्यामध्ये घरातील सदस्यांची चांगलीच झुंबड उडाली.

झाले असे की, टीना दत्ता (Tina Dutta) चलत असताना अचानक तिचा पाय मुरडतो आणि ती जोरात ओरडते. तेवढ्यात शालिन आणि स्टॅन तिची मदत करण्यास जातात, स्टॅन तिची मदत करण्याचा प्रयत्न करतो मात्र, टीना त्याला सोड असं म्हणत होती मात्र, तरीही स्टॅनने तिचा पाय सोडला नाही आणि त्यामुळे शालिन स्टॅनला रागामध्ये म्हणतो की, मी करत आहे तु सोड, तेव्हा स्टॅन रागामध्ये निघून जात शालिनला शिवीगाळ करतो आणि दोघांमध्ये चांगलाच वाद पेटतो.

 

View this post on Instagram

 

या दोघांमध्ये वाद एवढा पेटतो की, ते दोघेही एकमेकांना खूप शिवीगाळ करतात मात्र, शालिन स्टॅनच्या आई वडीलांना देखिल मध्ये आणतो त्यामुळे स्टॅनचा पारा गरम होतो आणि तो शालिनला मारण्यासाठी धाव घेतो. या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी निमरित कौर (Nimrit kaur), साजिद खान (Sajid Khan) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) जातात त्यांच्यामध्ये शालिनला पकडण्यासाठी सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) जिवाचा आटापिटा करत असते. मात्र, हे दोघे कणाचेही एकण्यास तयार नसतात. शालिनने स्टॅनला पकडून ठेवल्यामुळे शिव देखिल शालिनवर हात उचलण्याचा प्रयत्न करत असतो. यानंतर शालिन आणि स्टॅनला वेगळ्या खोलीमध्ये घेऊन जातात. आता पुढच्या भागामध्ये नेमकं काय होणार आहे याची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या सेटवर चंपक चाचाचा मोठा अपघात, पुन्हा परतणार का मालिकेत?
दु:खद! पंजाबच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास…

हे देखील वाचा