Wednesday, June 26, 2024

मिस इंडिया बनूनही मान्या सिंगला मिळेना काम, भाईजान करणार मदत?

टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस‘चा(Bigg Boss) सीझन 16 सुरू झाला आहे. शोचा पहिला भाग 1 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला होता, ज्यामध्ये सीझन 16 मधील सर्व स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात ग्रँड एन्ट्री घेताना दिसले होते. ‘बिग बॉस’च्या या सीझनमध्ये मिस इंडिया मान्या सिंग(Manya Singh) हिनेही प्रवेश केला आहे, जी मिस इंडिया 2020 ची उपविजेती होती. मान्या या शोमध्ये आली आणि तिने सांगितले की, ती तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येथे आली आहे. इतकेच नाही तर मान्याने सलमान खानच्या शोमध्ये तिच्या संघर्षाबद्दलही सांगितले आहे.

‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर मान्या सिंगने तिच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल सांगितले. ती म्हणाला की, लोकांना वाटते की मिस इंडिया झाल्यानंतर आयुष्य बदलले आणि माझेही बदलले असावे. भरपूर पैसे मिळतील. पण तसे नाही. वास्तविकता अशी आहे की, मिस इंडिया रनर अप झाल्यानंतरही मला कोणतेही काम मिळाले नाही. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मला एक जाहिरात मिळाली.

 

View this post on Instagram

 

पुढे, मान्या सिंगने सांगितले की, लोक तिच्या गडद रंगावर टिप्पणी करतात. ती मिस इंडिया रनर अप झाली आहे पण आजही तिचे वडील ऑटो चालवतात आणि आजही ती तिच्या वडिलांच्या ऑटोमध्ये प्रवास करते. त्याची आईही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करते. पैसे वाचवण्यासाठी. आपल्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल बोलताना मन्या सिंग खूपच भावूक झाली.

मान्या सिंह मूळची उत्तर प्रदेशचा असून ती ‘बिग बॉस’मध्ये पैसा आणि नाव कमवण्यासाठी आली आहे. याचा खुलासा तिने शोमध्ये केला. ब्युटी क्वीन म्हणाली की, तिला पैसे कमवायचे आहेत. मान्याच्या या गोष्टींनी सलमान खानही खूप प्रभावित झाला आहे. मात्र, आता या शोमधील उर्वरित स्पर्धकांना मान्या सिंग किती स्पर्धा देऊ शकेल? हे येत्या एपिसोड्समध्येच कळेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

फेक फोटोंमुळे चर्चेत आले होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, यादीमध्ये आहेत मोठ मोठे अभिनेते
चित्रपटापेक्षाही जास्त लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘या’ पाच वेबसीरिज, पाहा यादी

हे देखील वाचा