Monday, July 1, 2024

माेठा खुलासा! बिग बाॅसच्या घरात शालीन अन् टीना करत हाेते बाळाचे प्लॅनिंग?

बिग बॉस 16‘मध्ये एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम हे स्पर्धक अनेकदा भांडताना दिसतात. दोन्ही स्पर्धक कधी घरातील कामाबद्दल तर कधी पालकांबद्दल अपशब्द वापरताना दिसतात. शनिवार का वारच्या एपिसोडमध्ये, होस्ट सलमान खानने एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम या दोघांना त्यांच्या भांडणासाठी फटकारले. याशिवाय शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्या नात्याबद्दल घरातील सदस्यांसमोर अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. अशातच, रविवार (दि. 8 जानेवारी)च्या एपिसोडमध्ये स्पर्धकांचे कुटुंबीय बिग बॉस शोमध्ये प्रवेश करणार आहेत. यानंतर कुटुंबातील सदस्य आठवडाभर एकत्र राहतील. अशातच येणाऱ्या एपिसाेडमध्ये शालीन आणि टीनामधील दुरावाही पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस 16चा रविवारचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये शालीन (shaleen bhanot) आणि टीना (tina datta) गार्डन एरियाच्या टेरेसवर बसले आहेत. यादरम्यान, टीना शालीनशी बाेलत नसल्याने शालीन खूप अस्वस्त दिसताे. शालीन टीनाला विचारते की, “तुझं माझ्यावर प्रेम आहे का?” उत्तरात टीना म्हणते की “हो, मला तुझ्याबद्दल भावना आहेत, पण मी असे म्हणू शकते की, ताे तूच आहे, ज्याने माझ्याशी खेळ खेळला? येथे माझ्या कॅरेक्टरची धज्जियां उडाली, तुझ्या नाही”. यानंतर शालीन म्हणताे की, “पहिले तुच म्हणाली हाेती की, माझे शालीनवर प्रेम आहे आणि आता तुच पाठ फिरवत आहे.” टीना उत्तरात म्हणते की, “आपण एकमेकांना मूर्खात काढत आहाेत.” यावर शालिन म्हणताे की, “आपण आपल्या मुलांबद्दल बाेलत हाेताे.” यानंतर टीना हात जाेडून म्हणते की, “माझे कॅरेक्टर आधीच खराब झाले आहे, “माझ्यासोबत राहू नकोस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्रोमोमध्ये पुढे दाखवले की, घरातील सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहेत आणि बिग बॉस त्यांना सांगतात की, “तुम्ही सर्वजण तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मिस करत असाल तर एका दीर्घ प्रतीक्षेनंतर, कुटुंबातील सदस्य त्यांच्या प्रियजनांसोबत असतील.” यानंतर स्पर्धकाचे कुटुंबीय स्क्रीनवर दिसतात. (bigg boss 16 promo shaleen bhanot and actre`s`s tina datta planning for babies shocking thing revealed in salman show)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्फीने जावेद अख्तरांसोबतचा शेअर केला फाेटाे; म्हणाली, ‘शेवटी आज माझ्या आजोबांना…’

शाहरुखची लेक सलवार सूटमध्ये पाेहचला सिद्धीविनायक मंदिरात, देसी स्टाईल पाहून युजर्सही अचंबित

हे देखील वाचा