Thursday, November 30, 2023

आणखी काय हवं! शालीन भानोतने टीना दत्तासाठी केला 25 लाखांचा त्याग?

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे बिग बॉस 16मध्ये दर आठवड्याला नातेसंबंध बिघडतच राहतात. चांगला मित्र कधी शत्रू बनतो, याचा अंदाज येत नाही. वीकेंड का वारमध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्या नात्यात असाच बदल दिसून आला. बिग बॉसचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. बिग बॉसच्या घरात सुंबुल तौकीर आणि टीना दत्ता राहतील की, नाही याचा निर्णय शालीन भानोत याला घ्यायचा आहे, असे प्राेमाेमध्ये दाखवण्यात आले आहे. या बदल्यात शालीनलाही मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

सोशल मीडियावर टीना दत्ता ( tina datta) हिची शोमधून बाहेर पडल्याची बातमी आली आहे. बिग बॉसमधून अभिनेत्रीच्या बाहेर पडल्याची बातमी आल्यापासून #NoTinaDattaNoBB ट्विटरवर ट्रेंड हाेऊ लागला. टीना दत्ताला शोमधून बाहेर काढू नये, अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे. त्याच वेळी, शोचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये सलमान खान (salman khan) शालीन भानोट (shalin bhanot ) याला टीना दत्ता आणि सुंबुल तौकीर (sumbul touqeer) यांच्यापैकी एक वाचवण्याची संधी देतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सुंबूल आणि टीनाला बाहेर काढायचे नसेल, तर सलमान शालीनला बजर दाबायला सांगतो. मात्र, त्याऐवजी त्याच्या खात्यातून 25 लाख रुपये काढले जातील.

शालीन ‘सर-सर’ म्हणत सलमानला रिक्वेस्ट करत आहे, असे प्रोमोमध्ये दिसत आहे. मात्र, सलमान त्यांचे एकही ऐकत नाही. प्रोमो पाहता, असे दिसते की, शालीनने 25 लाख रुपयांचा बजर दाबला नाही. यामुळे टीना दत्ताला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात येणार आहे. प्रोमो येण्याआधी टीना दत्तच्या एक्झिटची चर्चाही जोरात आहे. मात्र, माध्यमातील वृत्तानुसार, टीना काही दिवसांसाठी बेघर होणार असल्याचेही बोलले जात आहे. तिला सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. (actor salman khan offer shalin bhanot to choose among tina datta sumbul touqeer and 25 lakh rupees money prize)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ दिग्दर्शकिने कापले स्वत:चेच केस आणि पाठवले चित्रपट महाेत्सवात, समाेर आले धक्कादायक कारण

‘तू सेफ्टी पिन लावली असती…’, उर्फीचा पदर पडताच विस्फारले चाहत्यांचे डाेळे, केल्या भन्नाट कमेंट

हे देखील वाचा