शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ या रियॅलिटी या शोचा उपविजेता ठरला. शिव त्याच्या घरी परताच त्याचे कुटुंबिय आणि प्रियजनांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले. त्याचे जंगी स्वागत करतांनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याला विजेत्यापदाची ट्रॉफी मिळवता आली नसली तरी, त्याने सर्वांचीच मने जिंकली. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. जनतेचा हिरो बनलेल्या शिवचा व्हायरल व्हिडिओ पाहूया…
एकेकाळी दूध आणि पेपर विकणारा शिव (Shiv Thackeray) आज अमरावतीचाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचा हिरो बनला आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात रोडीज या टिव्ही शो मधून केली, त्यानंतर तो ‘बिग बॉस मराठी सीझन 2’ चा विजेता बनला आणि आता ‘बिग बॉस 16’ (bigg boss 16) चा उपविजेता झाल्यानंतर त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे.
‘बिग बॉस 16’ मध्ये शिव ठाकरेला संपूर्ण देशाने खूप पसंती दिली होती. तो अमरावतीचा आहे, त्यामुळे शिव तिथल्या लोकांसाठी हिरो बनला आहे. ‘बिग बॉस 16’ संपल्यानंतर शिव त्याच्या अमरावतीच्या घरी गेला. घरी जाताच चाहत्यांनी त्याचे भव्य स्वागत केले. शिवचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शिवला पाहताच त्याचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले आहेत. त्याच्या चाहत्यांची क्रेझ पाहून शिव खूपच आनंदी दिसतोय.
View this post on Instagram
शिव ठाकरे याचा ‘बिग बॉस 16’ चा प्रवास खूप खास होता. सर्वांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले. विशेष म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. मात्र, ट्रॉफीचा विषय आल्यावर तो चुकला. मतदानाच्या बाबतीत त्याच्या जवळचा मित्र एमसी स्टॅन त्याच्यापेक्षा पुढे गेला. शिव पहिला उपविजेता ठरला. त्याला उपविजेतेपद मिळाले असले तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात तोच खरा विजेता आहे.
Remember The Name????❤️
"Shiv Manoharrao UttamRao Zinguji Ganuji Thakare"#ShivThakare???? #ShivThakare #ShivKiSena @ShivThakare9 pic.twitter.com/eSQwfuzLVw— THE SHIV THAKARE™ (@theshivarmy) February 14, 2023
Craze of #ShivThakare ????????????
Roads blocked, crackers bursting, music, dhol & crowd shouting and going crazy. #ShivKiSena #BB16 #BiggBoss @colorstv @BiggBoss pic.twitter.com/yTkvV7uv8F
— ???????????????????????????? ✧ (@medico_sane) February 14, 2023
शिव ठाकरे यांनी ‘बिग बॉस 16’ मध्ये खुलासा केला की, त्याचे मोठे सुपरस्टार बनण्याचे स्वप्न आहे. अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्यासाठी शिव हळूहळू पुढे सरकत आहे. अलीकडे, तिने खुलासा केला की ‘बिग बॉस 16 ‘ च्या आफ्टर पार्टीमध्ये सलमान खाननेत्याला (salman khan) काही मराठी प्रोजेक्ट्सबद्दल सांगितले आणि भविष्यासाठी काही मराठी चित्रपटांविषयी मार्गदर्शन केले. शिव लवकरच मराठी चित्रपटात दिसणार सांगण्यात येत आहे. (bigg-boss-16-runner-up-shiv-thakare-grand-welcome-see-videos)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय चित्रपटाचे ‘जनक’ दादासाहेब फाळके यांनी अशाप्रकारे दिले चित्रपटांना जीवनदान, वाचा त्यांचा प्रवास
शाहरुखने केले सिद्ध! ‘पठाण’ सिनेमाची 500 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, आता लक्ष्य 1000 कोटींवर