Friday, April 26, 2024

शाहरुखने केले सिद्ध! ‘पठाण’ सिनेमाची 500 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, आता लक्ष्य 1000 कोटींवर

तब्बल 4 वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहणे आणि पुनरागमन करताच ब्लॉकबस्टर सिनेमा देणे ही सोपी गोष्ट नाहीये. मात्र, हे शिवधनुष्य शाहरुख खान याने उचलले आणि स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. शाहरुखने ‘पठाण‘द्वारे पुनरागमन करत बॉलिवूडला आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा दिला. या सिनेमाने अनेक मोठ्या सिनेमांचा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शाहरुखच्या या सिनेमाची क्रेझ 22 दिवसांनंतरही कायम आहे. अशात ‘पठाण’ सिनेमाच्या कमाईतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. चला तर ‘पठाण’ सिनेमाची 22व्या दिवसाची कमाई जाणून घेऊया…

‘पठाण’ सिनेमाची 22व्या दिवसाची कमाई
शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा प्रत्येक दिवशी बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचत आहे. ‘पठाण’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. तेव्हापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अशात ‘पठाण’ सिनेमाची 22व्या दिवसाची कमाई (Pathaan Box office Collection Day 22) समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, ‘पठाण’ने 22व्या दिवशी 3.50 कोटी रुपये कमावले आहेत. मात्र, ही पहिल्या दिवसाच्या तुलनेत कमी कमाई आहे. असे असले, तरीही आता सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 502.35 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे ‘पठाण’ सिनेमा 500 कोटींच्या कमाईचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला आहे.

‘पठाण’ची 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘पठाण’ सिनेमाने ‘दंगल’, ‘केजीएफ चॅप्टर 2’, ‘द काश्मीर फाईल्स’ आणि इतर अनेक सिनेमांच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. देशभरातील बॉक्स ऑफिसवर धमाका करणाऱ्या शाहरुखच्या या सिनेमाने 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. इतकेच नाही, तर हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून काही पावलेच दूर आहे.

या सिनेमात शाहरुख खान याच्याव्यतिरिक्त दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. (shah rukh khan film pathaan box office collection day 22nd 500 crore)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाला आठवडा होताच कियाराला सोडून कामावर परतला सिद्धार्थ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
काळीज तोडणारी बातमी! 5 दशके इंडस्ट्री गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचे निधन, मिळवलेला ‘सेक्स बॉम्ब’चा किताब

हे देखील वाचा