अब्दु रोजिक हा बिग बॉस 16मधील सर्वाधिक लाडक्या स्पर्धकांपैकी एक आहे. शोमध्ये एंट्री घेतल्यापासून अब्दूल दिवसेंदिवस लाेकांच्या ह्रद्यात स्थान निर्माण करत आहे. घरातील सदस्यांमध्येही त्याला खूप पसंत केले जात आहे. अशातच अब्दुनं असे काही केले, ज्यामुळे ताे पुन्हा चर्चेत आला आहे. काय झाले नेमके बिग बाॅसच्या घरात? चला जाणून घेऊया…
खरं तर, अब्दू (abdu rozik) शिव ठाकरे (shiv thakare) आणि साजिद खान (sajid khan ) याला सांगतो की, “त्याला निम्रतसाठी काहीतरी खास करायचं आहे.” यावर साजिद आणि त्याची टिम त्याला प्रथम आयडिया देते जे ऐकूण अब्दू स्पष्टपणे सांगतो की, “तो असे काही करणार नाही.” यानंतर साजिद त्याला निम्रतसाठी त्याच्या पाठीवर काहीतरी लिहायला सांगतो आणि त्यासाठी अब्दूलही ते करण्यास सहमत हाेताे.
निम्रतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, साजिद आणि शिव अब्दूच्या पुढच्या भागावर ‘हॅपी बर्थडे निम्मी’ लिहितात आणि मागे एक अश्लील संदेश लिहितात. यानंतर ते अब्दूला एका खोलीत लपवतात आणि नंतर निम्रतला सरप्राईज देतात. अब्दूचा मेसेज पाहून निम्रतला खूप आनंद होतो.
View this post on Instagram
दुसरीकडे, अब्दूच्या पाठीवर लिहिलेल्या संदेशावर शिव, साजिद आणि इतर सदस्यही हसताना दिसत आहेत, ज्यावर युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. अब्दूच्या पाठीवर लिहिलेल्या मेसेजमुळे अनेक युजर्सनी साजिदला फटकारले आहे. एका युजरने लिहिले, “साजिद लाज वाटली पाहिजे, अब्दूला हिंदी समजत नाही. आम्हाला हा विनोद आवडणार नाही.”
If not bullying then what is this? Doing it with #AbduRozik who doesn't even understand the meaning properly. Sad part is whole #mandali was enjoying this
i hope @BeingSalmanKhan will take strong stand against this pic.twitter.com/7OqxYdKYjw
— The Khabri (@TheKhabriTweets) December 12, 2022
असेही काही युजर्स आहेत ज्यांनी आशा व्यक्त केली आहे की, सलमान खान विकेंड का वारमध्ये साजिद आणि त्याच्या टीमला नक्कीच फटकारेल आणि अब्दूसोबत झालेल्या गुंडगिरीबद्दल त्यांना चांगला धडा शिकवेल.(bigg boss 16 sajid khan and group troll for writing inappropriate message on abdu rozik back)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मराठी अभिनेत्याची गंभीर आजाराशी झुंज, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मदतीसाठी शेअर केली पोस्ट
‘कांतारा’ चित्रपटाच्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘जळफळाट’ तर रिषभ शेट्टीने दिले धमाकेदार उत्तर