Sunday, February 25, 2024

‘बिग बॉस 17’च्या पराभवाचा अंकिता घेणार बदला, नागीण बनून अंकित गुप्तासोबत करणार रोमान्स? चर्चांना आले उधाण

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे (ANkita Lokhande) ‘बिग बॉस 17’ ची विजेती होऊ शकली नाही, पण ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच तिला एकापेक्षा एक प्रोजेक्ट मिळत आहेत. काल अंकिताने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि तिच्या चाहत्यांना सांगितले की ती ‘वीर सावरकर’ चित्रपटात रणदीप हुड्डासोबतep Hudda)  (Rande स्क्रीन शेअर करणार आहे. एवढेच नाही तर हाती आलेल्या माहितीनुसार एकता कपूरने (Ekta Kapoor) अंकिताला तिच्या एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी साइनही केले आहे.

अंकिता लोखंडेने ‘बिग बॉस 17’ मधून खूप प्रसिद्धी मिळवली. शोदरम्यान अंकिता तिचा पती विकी जैनसोबत झालेल्या भांडणामुळे चर्चेत आली होती. आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही ती चर्चेत असते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, एकता कपूरने अंकिता लोखंडेला तिच्या हिट शो ‘नागिन 7’साठी साइन केले आहे. अंकिताने यापूर्वी एकता कपूरसोबतही काम केले आहे.

‘नागिन’ हा टेलिव्हिजनवरील हिट शोपैकी एक आहे. या शोमध्ये मुख्य भूमिका साकारणे हे टेलिव्हिजन जगतातील प्रत्येक अभिनेत्रींचे स्वप्न असते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अंकिता लोखंडे ‘नागिन’च्या पुढच्या सीझनमध्ये अंकित गुप्तासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अंकित गुप्ता ‘बिग बॉस 16’ मधून चर्चेत आला आहे. अंकित आणि अंकिताची जोडी एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता आहे. या दोन्ही स्टार्सचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या आवडत्या स्टार्ससाठी जोरदार कमेंट करत आहेत.

अंकिता जेव्हा ‘बिग बॉस 17’ मध्ये होती तेव्हा एकता कपूरने तिला उघडपणे पाठिंबा दिला होता. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून अंकिताला टेलिव्हिजनवर ओळख मिळाली. या मालिकेमुळे अंकिता रातोरात टेलिव्हिजन इंडस्ट्रीची स्टार बनली. अंकिताने सुशांत सिंग राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’मध्ये काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

जितेंद्र आव्हाडांनी केलं आशोक सराफांचं अभिनंदन,म्हणाले,’सरकारने कोणतीही “बनवाबनवी”… ‘
महाराष्ट्र भुषण आशोक सराफांनी दिली पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले.

हे देखील वाचा