Monday, April 15, 2024

Ayesha Khan: तेलुगु चित्रपटात काम करणं सोपं नाही; आयशा खान असं का म्हणाली?

बिग बॉस 17 मध्ये वादळ निर्माण करणारी अभिनेत्री आयशा खान (Ayesha Khan) सध्या चांगली चर्चेत आली आहे. बिग बॉस शो गाजवल्यानंतर आयशाला मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. लवकरच आयशा तेलुगु चित्रपटात दिसणार आहे. या दरम्यान, तेलुगु चित्रपटाच्या शुटींगदरम्यान आलेला अनुभव आयशाने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना आयशा खानने (Ayesha Khan)यासंदर्भात माहिती दिली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर माझ्या आयुष्यात खुप चांगल्या गोष्टी घडत आहेत. बिग बॉसच्या घरात राहणे खूप कठीण आहे, लोक कसे राहतात हे मला माहित नाही. या शोमध्ये मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण अगदी कमी कालावधीतही मला चाहत्यांकडून भरभरून पाठिंबा आणि प्रेम मिळाले आहे. अशी भावना आयशाने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.

तसेच ती पुढे म्हणाली, जेव्हा मला तेलुगु चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा मला स्कॅम वाटला. पण तसं नाही. मी हा प्रोजेक्ट एक आव्हान म्हणून स्विकारला आहे. त्यासाठी मी खुप मेहनत घेतली. तेलुगू भाषा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होती. पण मी ही भाषा लवकरच आत्मसात केली. जेव्हा मी चित्रपटाचे शूटिंग केले तेव्हा मला वाटत होते की मी ही भूमिका हिंदीमध्ये अधिक चांगल्या प्रकारे करू शकले असते’. असं आयशा (Ayesha Khan)यावेळी म्हणाली.

बिग बॉस १७ मध्ये गाजलेल्या स्पर्धकांमधील एक स्पर्धक म्हणजे आयशा खान. या शोमध्ये आयशा वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन लोकप्रिय झाली. आयशाने घरात येऊन ती मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचा खुलासा केला. इतकेच नव्हे तर मुनव्वर फारुकीच्या आयुष्याविषयी धक्कादायक खुलासे केले. त्यामुळे ती चांगलीच प्रकाशझोतात आली होती.

हेही वाचा:

सप्तपदीपूर्वी पुजा सावंतने समोस्यावर मारला ताव, Video Viral

Deepika Padukone : बॉलिवूड मस्तानीने दिली गुड न्यूज, सप्टेंबरमध्ये देणार बाळाला जन्म

हे देखील वाचा