Thursday, June 13, 2024

काँग्रेसने जूनमध्येच अर्चना गौतम हिला दाखवलाय पक्षाच्या बाहेरचा रस्ता होता, पक्षाच्या नेत्याने केला मोठा खुलासा

‘बिग बॉस 16’ ची तगडी स्पर्धक अर्चना गौतम (Archana gautam ) गेल्या काही दिवसांपासून तिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. अर्चना आणि तिच्या वडिलांचा दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेरून काढलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिच्या वडिलांसोबत गैरवर्तन करतानाचे दृश्य दिसत होते. तसेच अर्चना गौतमसोबत गैरवर्तनाची झलकही पाहायला मिळाली.

यानंतर अर्चना हिने पत्रकार परिषदेत या विषयावर मनमोकळेपणाने बोलले. नुकतेच अर्चना गौतम हिची काँग्रेस पक्षातून हकालपट्टीचे पत्र इंटरनेटवर व्हायरल झाले, ते पाहून लोकांना धक्काच बसला. मात्र, आता हे हकालपट्टीचे पत्र योग्य असल्याची पुष्टी झाली आहे. काँग्रेसने अर्चना यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

हस्तिनापूरमधील काँग्रेस विधानसभेच्या उमेदवार अर्चना गौतम हिची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मॉडेल आणि माजी ‘बिग बॉस 16’ स्पर्धक अर्चना गौतमला गैरवर्तन आणि अनुशासनाच्या कारणास्तव कॉंग्रेसमधून काढून टाकण्यात आले आहे, असे पक्षाच्या एका पत्रातून समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हिची या वर्षी जूनमध्येच हकालपट्टी करण्यात आली होती, मात्र काँग्रेसने तिला दिलेले पत्र नुकतेच व्हायरल झाले होते.

रिअॅलिटी शो स्पर्धक, अर्चना गौतमने ‘मिस बिकिनी इंडिया 2018’ हे खिताब जिंकले आणि ‘मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. गौतम यांनी 2022 ची उत्तर प्रदेश निवडणूक मेरठच्या हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती, पण त्यांना केवळ 1,519 मते मिळाली, त्यामुळे त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. अर्चनाच्या हकालपट्टीला काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी दुजोरा दिला आहे.

अंशू अवस्थी यांनी न्यूज पोर्टलला सांगितले की, ‘त्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तरीही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांचा आदर केला आणि त्यांना हस्तिनापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मेरठ युनिटमधील पक्ष कार्यकर्त्यांकडून सतत गैरवर्तनाच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पक्षाच्या शिस्तपालन समितीने अर्चना गौतम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्चना गौतम यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्याचे काँग्रेसच्या पत्रात म्हटले आहे. अवस्थी म्हणाले की, गौतमची हकालपट्टी करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती आणि उत्तर देण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात आला होता. नोटीसमध्ये म्हटले आहे की, मेरठ युनिटच्या पक्ष कार्यकर्त्यांकडून त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत ज्यात त्यांनी पक्ष निधी असूनही प्रचारासाठी भाड्याने घेतलेल्या अनेक वाहन मालकांची देणी त्यांनी भरली नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अंकित तिवारीच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, दोन मुलींनी भांडणात धरले एकमेकींचे केस, व्हिडिओ व्हायरल
नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये रणबीर कपूरसोबत दिसणार साई पल्लवी, ‘या’ दिवशी सुरू होणार चित्रपटाचे शूटिंग

हे देखील वाचा