प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त शो असलेल्या ‘बिग बॉस‘मधून अनेक कलाकार लोकप्रिय झाले. काहींनी ही लोकप्रियता टिकवण्यासाठी काहीच मेहनत घेतली नाही, तर काहींनी मेहनत घेत दररोज चर्चेत राहण्याची युक्ती शोधून काढली. त्या कलाकारांपैकीच एक म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फी तिच्या फॅशनमुळे लाईमलाईटमध्ये राहते. तिची विचित्र फॅशन पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. ती नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळेही चर्चेत असते. यामुळे तिला ट्रोल केले जाते. असेच काही युजर्सनी आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यावर उर्फीनेही राग व्यक्त केला आहे.
गुन्हा दाखल करणाऱ्यांवर भडकली उर्फी
उर्फी जावेद (Uorfi Javed) ही सातत्याने तिच्यावर होणाऱ्या गुन्ह्यांमुळे चिंतेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी ती म्हणाली होती की, लोक फक्त तिल टारगेट करत आहेत. मात्र, जे लैंगिक अत्या’त्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, त्यांच्याविरुद्ध कोणतेही पाऊल उचलले जात नाहीये. उर्फीने इंस्टा स्टोरीवर राग व्यक्त करत लिहिले की, “माझ्या विरुद्ध पोलीस तक्रार! व्वा. मी हैराण आहे की, कशाप्रकारे लोकांना मला मारण्याची आणि लैंगिक अत्या’चाराची धमकी देणाऱ्यांची समस्या नाहीये. तुम्हाला माझ्या ड्रेसमुळे फक्त माझ्याशी समस्या आहे, पण लैंगिक अत्या’चार आणि हत्या करणाऱ्यांशी नाहीये.”
उर्फीने दिला पुरावा
उर्फी जावेद हिने तिच्या इंस्टा स्टोरीवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. स्टोरीमध्ये उर्फी नारंगी रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. ही स्टोरी शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रेस्टॉरंटमध्ये आहे. मी इथे खूप चांगली दिसत आहे. कृपया हा व्हिडिओ पुरावा म्हणून कोर्टात दाखवा. माझी इतकीच विनंती आहे.”
View this post on Instagram
उर्फीची विचित्र फॅशन
उर्फी तिच्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळे प्रयोग केले आहेत. कधी तिने सिम कार्डने बनलेला ड्रेस, कधी सायकलच्या चैनने आपला आऊटफिट बनवला आहे. इतकेच नाही, तर तिने काही दिवसांपूर्वी रेजर ब्लेडने बनलेला ड्रेसही परिधान केला होता. त्यामुळेही उर्फी खूपच चर्चेत आली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
व्हिडिओ: टीनाची एन्ट्री आणि शालीनचा यू-टर्न; म्हणाला, ‘मी सिद्ध करून दाखवेल किती तडफडलोय’
भावाचा विषयच हार्ड! प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट, नेटकरी म्हणाले, ‘दोघीही…’