Wednesday, March 19, 2025
Home अन्य भावाचा विषयच हार्ड! प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट, नेटकरी म्हणाले, ‘दोघीही…’

भावाचा विषयच हार्ड! प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट, नेटकरी म्हणाले, ‘दोघीही…’

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अशात तो पुन्हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत आला आहे. अरमानच्या दोन पत्नी आहेत. त्यांची नावे क्रितिका मलिक आणि पायल मलिक अशी आहेत. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाला आहे. अशात वृत्त आहे की, अरमानच्या दोन्ही पत्नी प्रेग्नंट असून त्या आई बनणार आहेत. ही माहिती स्वत: अरमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. मात्र, अरमानने ही आनंदाची बातमी जगजाहीर करताच तो ट्रोल झाला.

युट्यूबर अरमान मलिक (Youtuber Armaan Malik) याने त्याच्या दोन्ही पत्नी क्रितिका मलिक (Kritika Malik) आणि पायल मलिक (Payal Malik) यांचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. दोघांनीही सारख्याच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तसेच, अरमान नारंगी रंगाच्या स्वेटशर्टमध्ये दिसत आहे. हा फोटो सोशळ मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोंवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

अरमानने सोशल मीडियावर फोटो शअर करताच एकीकडे त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला, तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. एका युजरने लिहिले की, “मी हैराण आहे. दोघीही एकसोबत कशा प्रेग्नंट होऊ शकतात?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “दोघीही एकसोबतच प्रेग्नंट झाल्या आहेत का?” दुसरीकडे, एका युजरने लिहिले की, “पायलवर प्रेम करत नाही, तो नेहमी त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. यावरून समजते की, अरमान त्याच्या दुसऱ्या पत्नीला जास्त महत्त्व देतो.”

अरमानचे कुटुंब
अरमान मलिक याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 2011मध्ये पायल मलिक हिच्यासोबत संसार थाटला होता. त्यांना एक मुलगाही आहे. त्याचे नाव चिरायू मलिक असे आहे. त्यानंतर अरमानने 2018मध्ये क्रितिका मलिक हिच्यासोबत लग्न केले होते, जी पहिली पत्नी पायल मलिकची खूपच चांगली मैत्रीण राहिली आहे. सोशल मीडियावर हे तिघेही दैनंदिन आयुष्यातील व्लॉग आणि रील व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.

अशात अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट झाल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! नोराने जॅकलीन विरोधात दाखल केला मानहानीचा खटला; म्हणाली, ‘बदनाम करण्याचा प्रयत्न…’
‘काय बघता, कोंबडी- मटण पाठवा माझ्यासाठी…’, राखीचा ‘बिग बाॅस मराठी’मध्ये जोरदार ड्रामा; व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा