Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग बॉस मराठीच्या घरातून पाच लाख घेऊन उत्कर्ष शिंदे होणार बाहेर? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा

बिग बॉस मराठी ३‘ हा या वर्षातील सर्वात जास्त चर्चेत राहणार शो ठरला. अनेक लोकप्रिय मालिकांना मागे सारत या शोने टीआरपीच्या यादीत त्यांचे स्थान निर्माण केले. या शोला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या वर्षी कोरोनाचे वातावरण असल्याने याशोमध्ये अनेक नवीन नियम बनवण्यात आले आहेत. अशातच रविवारी (२६ डिसेंबर) रोजी या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. शोमध्ये सध्या टॉप ५ स्पर्धक उरले आहेत. मीनल शाह, विशाल निकम, विकास पाटील, जय दुधाने, उत्कर्ष शिंदे हे स्पर्धक आहेत. त्यामुळे आता शोचा विजेता कोण होणार आहे, याची वाट अवघा महाराष्ट्र बघत आहे.

अशातच बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेमधून एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे देखील उपस्थित होता. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, शिव बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसमोर गेलेला असतो. त्यावेळी मांजरेकर घरातील स्पर्धकांना म्हणतात की, “या बॅग मध्ये ५ लाख रुपये आहेत, कोणीही ते घ्या आणि घराबाहेर जा.” (bigg boss marathi 3, contestent promo viral on social media)

यावेळी सगळेच ती रक्कम घेण्यास नकार देतात. यावेळी मांजरेकर म्हणतात की, “ही रक्कम विजेत्याला देखील मिळणार नाही.” यावेळी आदर्श शिंदे हात वर करताना दिसतो. हे पाहून सगळेच हैराण होतात की, उत्कर्षने असा निर्णय का घेतला.

हा प्रोमो पाहून तरी असा अंदाज येत आहे की, उत्कर्ष ती पैशाची पेटी घेऊन घराबाहेर येईल आणि घरात टॉप ४ स्पर्धक राहतील. परंतु आता नक्की काय होणार आहे हे आपल्याला आज रात्री फिनालेमध्येच दिसणार आहे. या फिनालेकडे आख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

‘आनंदी राहण्यासाठी रिस्क घ्यावी लागते’, म्हणत सुश्मिताने शेअर केली पोस्ट ‘याच’ कारणामुळे झाले त्यांचे ब्रेकअप?

खरंच की काय! ख्रिसमसच्या दिवशी कॅमेऱ्यासमोरच बदलले सनी लिओनीनी कपडे, बघतच राहिले नेटकरी

‘ही दोस्ती तुटायची नाय’, बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला दिसणार ‘या’ स्पर्धकांचे मैत्रीप्रेम 

 

हे देखील वाचा