‘आनंदी राहण्यासाठी रिस्क घ्यावी लागते’, म्हणत सुश्मिताने शेअर केली पोस्ट ‘याच’ कारणामुळे झाले त्यांचे ब्रेकअप?


काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुश्मिता सेनने तिचे ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले. बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत काहीवर्षांचे असलेले नाते सुश्मिताने संपवले. तिच्या या अचानक केलेल्या खुलाशामुळे या ब्रेकअपबद्दल नेटकऱ्यांमध्ये आणि मीडियामध्ये अनेक कयास लावले जात आहेत. याआधी अनेकदा सुश्मिता आणि रोहमन यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. मात्र नेहमीच त्या अफवा ठरल्या. खुद्द सुश्मितानेच अनेकदा या बातम्यांना अफवा ठरवले होते. आता मात्र तिनेच ब्रेकअपबद्दल सांगितल्यामुळे या मागे काय कारण असावे यावर अनेक मतं येत आहेत.

मात्र नुकतेच सुश्मिताने स्वतः तिच्या ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने थेट तर तिच्या ब्रेकअपचे कारण सांगितले नाहीये. मात्र थोड्या शब्दात ती बरेच काही बोलून गेली आहे. सुश्मिताने सोशल मीडियावर तिचा एक फोटो आणि त्या फोटोसोबत काही ओळी लिहिल्या आहेत, ज्यावरून तिच्या ब्रेकअपचे अप्रत्यक्षरित्या कारण तिने सर्वांना सांगितले आहे.

सुश्मिताने तिचा एक खूपच सुंदर गुलाबी ड्रेसमधील हसरा फोटो शेअर करत लिहिले, “जिवंत राहण्यासाठी जोखीम उचलावी लागते…आनंदी राहण्यासाठी रिस्क घ्यावी लागते. यासाठी खूप हिमतीची आवश्यकता असते. तुमच्या सर्वांमध्ये हिंमत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा आपण सर्व करू शकतो. कोणीही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. मी तुमच्यावर प्रेम करते.” सुश्मिताचा हा फोटो आणि ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिचे फॅन्सदेखील तिच्या या पोस्टवर कमेंट्स करताना दिसत आहे. एकाने लिहिले, “तू खूप छान आहेस”, दुसऱ्याने लिहिले, “जगातील तू सर्वात सुंदर आत्मा आहेस”.

याआधी सुश्मिताने तिच्या ब्रेकअपच्या घोषणा करताना तिचा आणि रोहमन शॉलचा एक आनंदी फोटो शेअर करत लिहिले, “आपण मित्र म्हणून सुरुवात केली आणि आपण नेहमीच मित्र राहिलो. नाते खूप आधीच संपले होते, मात्र प्रेम राहिले होते.” सुश्मिता आणि रोहमन यांनी २०१८ साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. रोहमन तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान होता. यामुळे त्यांना खूप ट्रोल देखील केले गेले. आता ब्रेकअपनंतर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!