Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड खरंच की काय! ख्रिसमसच्या दिवशी कॅमेऱ्यासमोरच बदलले सनी लिओनीनी कपडे, बघतच राहिले नेटकरी

खरंच की काय! ख्रिसमसच्या दिवशी कॅमेऱ्यासमोरच बदलले सनी लिओनीनी कपडे, बघतच राहिले नेटकरी

ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ बॉलिवूडमधून समोर येत आहेत. सर्व स्टार्सनी आपापल्या पद्धतीने हा सण साजरा केला. यावेळी अभिनेत्री सनी लिओनीही (Sunny Leone) खूप उत्साहित दिसली. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ख्रिसमसच्या गाण्यावर मजा करताना दिसत आहे आणि काही क्षणात ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी तयार होते. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

सनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पहिल्यांदा कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने पांढऱ्या टी-शर्टसह शॉर्ट्स घातले आहे. बॅकग्राऊंडला ख्रिसमस सेलिब्रेशनचे गाणे सुरू आहे. या गाण्यावर सनी डान्स करताना दिसत आहे. तिच्या हातात भेटवस्तूचे एक पॅकेट आहे. तिने हे पॅकेट हवेत फेकताच तिचा पेहराव डोळ्याची पापणी पडताच बदलतो आणि ती ख्रिसमससाठी तयार होते. काळ्या टी-शर्ट आणि लाल स्कर्टमध्ये सनी ख्रिसमसच्या लूकमध्ये दिसत आहे. तिच्या डोक्यावर सँटाची टोपीही दिसत आहे.

सनीने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वर्षातील हा काळ माझा सर्वात आवडता असतो. सर्वांना सुट्टीच्या शुभेच्छा.” सनीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून, ते यावर जोरदार कमेंट करत आहेत.

सनी लिओनी सध्या तिच्या ‘मधुबन’ (Madhuban Song) गाण्यामुळे वादात आहे. या गाण्यावर अनेक हिंदू संघटनांनी आपला निषेध नोंदवला आहे. या गाण्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप असून, या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.


सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. हे गाणे मोहम्मद रफीच्या १९६० मध्ये आलेल्या ‘कोहिनूर’ चित्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्यावर आधारित आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा