‘ही दोस्ती तुटायची नाय’, बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला दिसणार ‘या’ स्पर्धकांचे मैत्रीप्रेम


आख्या जगात कोरोनाने थैमान घातले होते आणि सगळे बिग बॉस प्रेमी वाट बघत होते, ते म्हणजे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची. अनलॉक एंटरटेन्मेंट म्हणत बिग बॉसच्या बहूप्रतिक्षीत तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. शो सुरू झाल्यापासून शोमधील स्पर्धक सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत. कोरोना काळात हे पर्व सुरू झाले आहे त्यामुळे या वेळी हे पर्व काही वेगळ्या नियमांनी बांधलेले होते. हा हा म्हणता या शोचे १०० दिवस पूर्ण झाले आहेत. सुरुवातीला १४ स्पर्धकांपासून सुरू झालेल्या या शोमध्ये शेवटी केवळ टॉप ५ स्पर्धक राहिले आहे. या पाच स्पर्धकांमध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे.

रविवारी (२६ डिसेंबर) रोजी संध्याकाळी ७ वाजता या शोचा ग्रँड फिनाले सुरू होणार आहे. फिनालेसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता कोणता स्पर्धकांचे बिग बॉस मराठी सिझनच्या ट्रॉफीवर नाव कोरले जाणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.  (bigg boss marathi 3 grand finale, contestent dance promo viral)

अशातच या शोच्या ग्रँड फिनालेचा घरातील टॉप ५ स्पर्धकांचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्येक पर्वामध्ये आपल्याला लव्हस्टोरी पाहायला मिळते; परंतु या पर्वाची खास गोष्ट म्हणजे या पर्वत मैत्री उजवी ठरली. अनेकांच्या मैत्रीच्या गोष्टी या पर्वात रंगल्या आहेत. यात विशाल-विकास, जय-उत्कर्ष, सोनाली-मीनल यांची मैत्री खूप गाजली.

ग्रँड फिनालेमध्ये घरात याच मित्रांचा डान्स पाहायला मिळणार आहे. यात विकास आणि विशाल ‘ही दोस्ती तुटायची नाय’वर डान्स करणार आहेत, तर जय आणि उत्कर्ष ‘जबरा फॅन’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळणार आहे. त्यांचा या डान्सचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता या शोचा ग्रँड फिनाले बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

हरनाज संधूने मिस युनिव्हर्ससाठी केली होती ‘अशी’ तयारी, डॉक्टर योगी अमृतराज यांनी सांगितली गुपिते

शर्मिष्ठा राऊतच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, ऍनिव्हर्सरी पार्टीला लावले ‘या’ कलाकारांनी ‘चार चाँद’

ठरलं तर! ‘वेलकम ३’मध्ये पुन्हा कॉमेडीचा तडका लावणार नाना पाटेकर, अनिल कपूर अन् परेश रावल 

 


Latest Post

error: Content is protected !!