Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अर्रर्र! कार्यादरम्यान गायत्रीला झाली दुखापत, ‘बिग बॉस’ने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण आदेश

यावर्षी ‘बिग बॉस मराठी’चे पर्व चांगलेच चर्चेत आले आहे. खेळ खेळताना स्पर्धकांना स्वतःचे भान राहत नाही आणि हा खेळ त्यांच्या जीवाशी येतो. अशीच एक घटना घरात घडली आहे. साप्ताहिक कार्यात स्पर्धक बेभान झाले होते आणि ते जिंकण्यासाठी कसलाही विचार करत नव्हते. बिग बॉसने वारंवार सूचना देऊन देखील स्पर्धकांनी त्यांची मर्यादा सोडली आणि त्यांच्यात हाणामारी झाली.

घरात एक एलियन आले आहे. त्यांच्या यानातील इंधन संपले असते त्यामुळे घरातील सदस्यांना इंधन भरायचे असते. हे आठव्या आठवड्याचे साप्ताहिक कार्य आहे. यावेळी घरात दोन टीम होत्या. यावेळी आपली पाईप लाईन वाचवण्यासाठी दोन्ही टीममधील स्पर्धक प्रयत्न करत असतात. यावेळी विकास गायत्रीमध्ये हातापायी होते.
(Bigg Boss Marathi 3 : gayatri datar injured in task)

गायत्री जेव्हा विकासच्या टीमची पाईपलाईन नष्ट करण्यासाठी येते, तेव्हा विकास तिला अडवतो. या दरम्यान धक्काबुक्की होते आणि गायत्रीचा हात दुखायला लागतो. त्यानंतर डॉक्टर तिला तपासतात. यानंतर बिग बॉस तिला सांगतात की, तिच्या खांद्याचा एअरलाईनमध्ये फ्रँकचर झाले आणि पुढील काही दिवसात तिला आराम करावा लागणार आहे. तसेच तिला स्लिंग घालण्याचा सल्ला दिला. तसेच पुढील तीन आठवडे गायत्रीला टास्क खेळता येणार नाही असे सांगितले.

हे ऐकून गायत्री काही प्रमाणात दुःखी झाली. तसेच तिच्या आणखी काही टेस्ट केल्या जाणार आहे. त्यामुळे आता गायत्री कधी बरी होणार आहे आणि तिला कधी खेळायला मिळेल असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येत आहेत. तसेच गायत्री या आठवड्यात नॉमिनेट झाल्यामुळे ती या आठवड्यात घरा बाहेर जाईल की काय? अशी भीती देखील निर्माण झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू मला परवानगी दिली म्हणून…’, सुंदर कॅप्शनसह स्मिता तांबेने केला तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर

-अरे व्वा! मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

-अभिनेत्री ऋतुजा बागवेची सुंदरता अशी की, पाहून चाहताही म्हणाला, ‘दीपिका पदुकोणचे मराठी व्हर्जन’

हे देखील वाचा